पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजींचे पुणे विमानतळावर स्वागत !💐
मनस्वी स्वागत ! देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजींच्या शुभहस्ते पुण्यनगरीत विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण आज संपन्न झाले. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे मोदीजींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. यानिमित्ताने मोदीजींचे पुण्यनगरीत आगमन झाले असता सकाळी त्यांचे पुणे विमानतळावर स्वागत केले.!💐
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांचे पुणे विमानतळावर सहकाऱ्यांसोबत स्वागत
देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार देखील पुण्यात आले असता त्यांचे पुणे विमानतळावर सहकाऱ्यांसोबत स्वागत केले.
‘मन की बात’ संवाद
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांचा देशवासियांशी होणारा ‘मन की बात’ हा संवाद भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर कार्यालयात सहकाऱ्यांच्या सोबत ऐकला. या संवादात येत्या १५ ऑगस्टला पुन्हा ‘#हर_घर_तिरंगा’ अभियान देशभरात यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तसेच हुतात्मा झालेल्या वीरांना आणि वीरांगनांना आदरांजली देण्यासाठी 'माझी माती माझा देश' या मोहिमेची घोषणा केली. ह्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहुन काम करू.
रूबी हॉल क्लिनिक येथे कर्करोगावर शस्त्रक्रियेशिवाय उपचार करणारे पहिले लेझर मशिन "cyberknife S7"
रूबी हॉल क्लिनिक आणि बजाज फिनसर्व्ह यांच्या संयुक्त प्रयत्नातून रूबी हॉल क्लिनिक येथे कर्करोगावर शस्त्रक्रियेशिवाय उपचार करणारे पहिले लेझर मशिन "cyberknife S7" बसवण्यात आले आहे. या मशिनचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या लेझर प्रणालीमुळे पुणे उपचारांचं हब होण्यास मदत होईल तसंच याचा फायदा शहरी आणि ग्रामीण, सर्वच भागातल्या नागरिकांना होईल.
पुणे मेट्रो विस्तारित टप्पा १ ऑगस्टपासून प्रवाशांच्या सेवेत
देशाचे लाडके प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी जी १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या विस्तारित टप्प्याचे म्हणजेच फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल या मार्गिकेचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत रुबी हॉल, सिव्हिल कोर्ट आणि शिवाजीनगर मेट्रो स्थानकांची पाहणी केली. सोबतच रुबी हॉल स्थानक ते शिवाजी नगर मेट्रो स्थानकादरम्यान प्रवासदेखील केला. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेले पुणे आणि औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवड दरम्यान आता अवघ्या २२ मिनिटांत प्रवास करणे नवीन विस्तारीत मार्गिकेमुळे शक्य होणार आहे. सिव्हिल कोर्ट येथील इंटरचेंज स्टेशनमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतील नागरिकांना सेवेचा फायदा होणार आहे. शहरांतील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.
आचार्य अत्रेंच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांसाठी पुणेकरांच्यावतीने आयुक्तांना साकडे
साहित्यसम्राट प्रल्हाद केशव अत्रे तथा #आचार्यअत्रे यांची १२५ वी जयंती तेरा ऑगस्ट २०२३ पासून सुरू होत आहे. पुण्याच्या कला, #संस्कृती, #साहित्य आणि समाजकारणावर आचार्य अत्रे यांची अमीट छाप आहे. त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्यावतीने कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे, अशी मागणी घेऊन पुणे महानगरपालिका आयुक्त श्री.विक्रम कुमार यांना भेटलो आणि निवेदन दिले. यावेळी '#संवाद 'चे सुनील महाजन सोबत होते.
पीएम किसान योजना कार्यक्रम
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध मोदी सरकार देशाचे प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते #PMKisan योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे थेट बँक खात्यावर वितरण व कृषी क्षेत्रातील नवीन योजनांचे लोकार्पण करण्यात आले. #भाजप, पुणे ग्रामीण #किसान मोर्चाच्यावतीने या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण मावळ तालुक्यातील दारुंब्रे या गावात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मोदीजींचे कृषी हिताचे दूरदर्शी विचार ऐकले. एक रुपयात पिक विम्याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. किसान सेवा केंद्राद्वारे शासकीय सर्व योजनांची माहिती घ्यावी आणि इतरांपर्यंतही माहिती पोहोचवावी. मोदी सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे, असा विश्वास यावेळी शेतकरी बांधवांना दिला. विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या मावळ तालुक्यातील विद्यार्थिनींचा सत्कारदेखील माझ्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री श्री. बाळाभाऊ भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशतात्या भेगडे, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, तालुक्यातील इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.
लोकसभा प्रवास योजनेची आढावा बैठक
पक्षाने नियोजन केलेल्या लोकसभा प्रवास योजनेची आढावा बैठक राष्ट्रीय महामंत्री मा.श्री. विनोदजी तावडे आणि प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पुण्यात पार पडली. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळात पार पडलेल्या या बैठकीत बारामती, मावळ, शिरुर आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. पक्षाचा उपाध्यक्ष या नात्याने पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ, शिरूर या मतदारसंघाची जबाबदारी प्रभारी या नात्याने माझ्याकडे आहे. त्याअनुषंगाने ही बैठक महत्वाची आणि मार्गदर्शक होती. बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा करून सुरु असलेली तयारी, सद्य राजकीय स्थिती, संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि पुढची रणनीती तसेच आगामी पक्ष कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. २०२४ च्या निवडणुकीत भाजपच्या महाविजयाचे लक्ष्य ठेवून चारही लोकसभा जिंकण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या बैठकीसाठी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, सरचिटणीस विक्रांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळाभाऊ भेगडे, मा.खासदार अमरजी साबळे, पुणे शहराध्यक्ष धीरजजी घाटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, संयोजक, विस्तारक आणि लोकसभा निवडणूक प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे जी यांनी नुकतीच पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील जिल्हाध्यक्ष आणि विविध आघाडीच्या प्रमुखांची नियुक्ती केली आहे. पुणे जिल्ह्यात पुणे शहराचे अध्यक्ष म्हणून धीरज घाटे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप, पुणे ग्रामीण (मावळ) शरद बुट्टे पाटील, वासुदेव नाना काळे पुणे ग्रामीण (बारामती), किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्षपदी गणेश भेगडे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री दिलीप कांबळे, कामगार आघाडी विजय हरगुडे, क्रीडा प्रकोष्ट संदीप आप्पा भोंडवे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. आज पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच नवनियुक्त सर्वच पदाधिकारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पक्षसंघटनेला अधिक बळ देतील आणि आगामी सर्वच निवडणूकात भाजपा संघटनेच्या जोरावर क्रमांक एकचा पक्ष राहील याची खात्रीही दिली.
देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचे उदघाटन
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रसेवा प्रतिष्ठान बावधन, रोटरी क्लब पुणे प्राईड, आणि माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचे उदघाटन आज माझ्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला आणि रक्तदान केलेल्या मान्यवरांना प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुधीर बापट, कम्युनिटी अध्यक्ष अनिल कासोडेकर उपस्थित होते.
युवासंवाद - पहिले पुष्प: जळगाव!
आत्मनिर्भर भारताला विश्र्वगुरु बनविण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले 'पंचप्रण' महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकापर्यंत पोचविण्याचा संकल्प म्हणजे - 'युवासंवाद' ! आज जळगाव येथे तरुणांच्या सकारात्मक प्रतिसादात ' युवासंवाद उपक्रमाचे पहिले पुष्प गुंफले गेले. यावेळी तरुणांशी संवाद साधताना संमेलनाविषयी सविस्तर भूमिका मांडली. मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारताला विश्वगुरु बनविण्यासाठी 'पंचप्रण' ही संकल्पना मांडली. 'पंचप्रण' च्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असेही अधोरेखित केले. या अनुषंगाने भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या युवा कल्याण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुण्यात २६ व २७ मे २०२३ या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून "पंचप्रण:युवा संवाद" हा राज्यस्तरीय उपक्रम आयोजित करण्यात आला होता. याअंतर्गत अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या दरम्यान हा उप्रकम महाराष्ट्रभर राबविण्याचा संकल्प करण्यात आला. त्याचेच पहिले पुष्प "जी-२० युवा संवाद @२०४७" हे संमेलन शनिवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे युवकांच्या भरघोस प्रतिसादात पार पडले. उत्तर महाराष्ट्रातून १५०० हून अधिक विशेष निवड झालेले विद्यार्थी या संमेलनात सहभागी झाले होते. संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि ग्रामविकासमंत्री मा.गिरीशजी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी खासदार रक्षाताई खडसे, आमदार मंगेश चव्हाण, प्रा.व्ही.एल माहेश्वरी, राजेंद्र नन्नवरे, आणि मोठ्या संख्येने विध्यार्थीमित्र उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर
सेवादीन: राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर संपन्न..! पुण्यातील ५०० हून अधिक जेष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी! आमचे नेते उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस 'सेवा दिन' म्हणून सर्वत्र साजरा करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात समर्थ युवा फाउंडेशन व वृद्धमित्र यांच्या सहकार्यातून एकता मित्र मंडळ, ए.आर.ए.आई. रोड, हनुमाननगर, केळेवाडी, कोथरूड या परिसरात 'महाआरोग्य शिबिर' आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये स्तन कर्करोग निदान तपासणी, साखर/ कोलेस्टेरोल तपासणी, छातीचा एक्सरे, रक्तदाब, रक्तातील संपूर्ण घटक सविस्तर तपासणी करण्यात आली. याशिवाय खास महिलांसाठी गर्भाशयाचा कर्करोग निदान तपासणीही करण्यात आली. हे आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सर्व डॉक्टर, नर्स, टेक्निकल स्टाफ, विद्यार्थी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि इतर सर्वांचे तसेच आश्वासक प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे मनःपूर्वक धन्यवाद.
श्री.धिरजजी घाटे यांची भाजप शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार
भाजपचे जेष्ठ नेते, माजी सभागृह नेते माझे सहकारी मित्र श्री.धिरजजी घाटे यांची भाजप शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुणे शहर पक्ष कार्यालयात त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. धीरजजी यांच्या नेतृत्त्वात भारतीय जनता पार्टीचे संघटन पुणे शहरात आणखी भक्कम होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, राघवेंद्र मानकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
९७ व्या अखिल भारतीय #मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. रवींद्रजी शोभणे यांची भेट
अमळनेर, #जळगाव येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय #मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. रवींद्रजी शोभणे यांची पुण्यात अचानक भेट झाली. #अमळनेर ही माझी जन्मभूमी. यंदाचे साहित्य संमेलन येथे होत असल्यामुळे मला मनस्वी आनंद होत आहे. त्यामुळे रवींद्रजींचा सत्कार करताना राहवले नाही. त्यांचा आदरसत्कार करून साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा केली. यावेळी संवाद पुणेचे सुनील महाजन व विकास पाटील सोबत उपस्थित होते.
'विद्यापीठ प्रशासन रचना' या विषयावर मार्गदर्शन
#अखिल_भारतीय_विद्यार्थी_परिषद च्यावतीने #बारामती शहरात आयोजित प्रदेश अभ्यास वर्गात 'विद्यापीठ प्रशासन रचना' या विषयावर मार्गदर्शन केले. या विषयाची मांडणी करताना नवे शैक्षणिक धोरण, #विद्यापीठ ॲक्ट, विद्यापीठाचे बदलणारे स्वरूप आदी विषयांवर मार्गदर्शन करत #अभाविप कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
हर घर भेट उपक्रमाअंतर्गत बारामती शहरातील विविध मान्यवरांच्या भेटी
Modi at 9 च्या अनुषंगाने बारामतीच्या संघटनात्मक दौऱ्यावर असताना, #हरघरभेट उपक्रमाअंतर्गत #बारामती शहरातील विविध मान्यवरांच्या भेटी घेऊन #मोदी सरकारच्या वतीने ९ वर्षात करण्यात आलेल्या विकास कामांच्या माहितीचे पुस्तक भेट दिले. यावेळी माजी कुलगुरू डॉ.अरुण अडसूळ, विद्या प्रतिष्ठान कॉलेजचे प्राचार्य डॉ.भारत शिंदे, टी.सी. कॉलेजचे प्राचार्य डॉ.जगताप सर आणि इतर प्राध्यापक उपस्थित होते.
बारामती शहर आणि तालुक्याच्या कोअर कमिटी सोबत बैठक
भारतीय जनता पार्टी बारामती शहर आणि तालुक्याच्या कोअर कमिटी सोबत बैठक पार पडली. यावेळी पक्ष संघटना बळकटीकरण आणि मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संघटनेच्यावतीने राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला.
चंद्रयान-३
मंजिले क्या है रास्ता क्या है, हौसला हो तो फासला क्या है !! एक क्षण गौरवशाली भारताचा, एक क्षण देशाभीमानाचा ! चंद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल ISRO - Indian Space Research Organisation च्या वैज्ञानिकांचे व टीमचे मनस्वी अभिनंदन! आदरणीय पंतप्रधान Narendra Modi जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत "अंतराळ क्षेत्रात" महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
चिखली, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी दि चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेत नवीन शैक्षणिक धोरणात (National Education Policy) नवीन काय बदल करण्यात आले आहेत यावर मार्गदर्शन.
शालेय शिक्षण क्षेत्रात या नव्या धोरणामुळे काय बदल झाले आहेत, आणि त्या माध्यमातून शालेय जीवनात विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार आहे यावर शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी यांच्यासोबत मार्गदर्शनपर चर्चा करत त्यांच्या शंकांचे निरसन केले. या चर्चेवेळी संस्थेचे सचिव आशुतोष गुप्ता व संचालिका पूजा गुप्ता, प्राचार्य शेटे सर आणि कर्मचारीवृंद उपस्थित होते.
५५ वा बालगंधर्व वर्धापनदिन सोहळा
बालगंधर्व रंगमंदिराचा ५५ वा वर्धापनदिन साजरा होतोय. यानिमित्ताने बालगंधर्व परिवार व बालगंधर्व रंगमंदिर यांच्यावतीने ५५ वा बालगंधर्व वर्धापनदिन सोहळा आज संपन्न झाला. बालगंधर्व रंगमंदिर आज ५६ व्या वर्षात पदार्पण करत आहे याचा अभिमान तर आहेच आणि कृतज्ञताही. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा संपन्न करणारे अनेक नामवंत कलाकार आणि कलाकृती इथेच घडल्या आहेत. अनेकांना यांची अनुभूती घेण्याचेही सौभाग्य लाभले आहे. वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गेले दोन दिवस येथे अनेक कार्यक्रम पार पडले आहेत. आज एका कार्यक्रमास उपस्थिती राहण्याचा योग आला. यावेळी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
पुणे एज्युकेशन फोरम च्या वतीने 'समूह विद्यापीठे ( Cluster University ): संधी व आव्हाने' या विषयावर चर्चासत्र
पुणे एज्युकेशन फोरम च्या वतीने 'समूह विद्यापीठे ( cluster university ): संधी व आव्हाने' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षीत असलेल्या समूह विद्यापीठांच्या (क्लस्टर युनिव्हर्सिटी) स्थापनेसाठी आवश्यक आराखडा राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे. या मार्गदर्शक तत्त्वाच्या मसुद्यावर येत्या ३० जूनपर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. आजच्या चर्चासत्रात विविध शैक्षणिक संस्थांचे संस्थांचालक, शिक्षण तज्ञ, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर यांनी सहभाग नोंदवत आपापली मते मांडली. यावेळी समूह विद्यापीठांचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल या दृष्टिकोणातून विचार विनिमय करण्यात आला. या चर्चासत्रात मान्यवरांनी मांडलेली मते, सूचना, बदल, अडचणी या सर्वांचा एकत्रित अहवाल बनवून पुणे एज्युकेशन फोरमच्या माध्यमातून लवकरच राज्य सरकारला सादर करणार आहोत.
महाजनसंपर्क अभियानांतर्गत भोर विधानसभा मतदारसंघ दौरा.
महाजनसंपर्क अभियान.. Modiat9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत आज भोर विधानसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या घरी जाऊन, मोदी सरकारच्या माध्यमातून गेल्या ९ वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची माहिती दिली.
पुणे शहरात जगन्नाथ रथ यात्रेचे आयोजन
हरे कृष्ण जय जय जगन्नाथ स्वामी! जगन्नाथ पुरी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातही जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज पालकमंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह या रथयात्रेत सहभागी होऊन भगवान जगन्नाथांची मनोभावे पूजा केली. यावेळी सर्व वातावरण भक्तीमय झाले होते.
मोदी @ ९ या विशेष महाजनसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर बारामती दौरा
मोदी @ ९ या विशेष महाजनसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज प्रदेशाध्यक्ष मा.श्री. Chandrashekhar Bawankule जी बारामती दौऱ्यावर येत आहेत. भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माझा देखील बारामती येथे हा पहिलाच संघटनात्मक दौरा होत आहे. त्यानिमित्ताने पक्ष पदाधिकाऱ्यांच्यावतीने स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाची संघटना बांधणी, बूथ सक्षमीकरण, तसेच पक्ष कार्यासंबंधी विविध मुद्द्यांवर आणि मोदी सरकारच्या विविध योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्या संदर्भात सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. बारामती तालुक्यातील सोनेगाव या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष श्री. Chandrashekhar Bawankule जी यांच्या प्रमुख उपस्थितीत टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या टिफीन बैठकीच्या माध्यमातून भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधून, एकत्रित भोजनाचा आस्वाद घेतला. सोबतच मोदींजींच्या सेवा, सुशासन, गरीब कल्याण आदी विषयांच्या अनुषंगाने विस्तृत चर्चाही झाली. बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे लाभार्थी संमेलनात सहभागी झालो. पंतप्रधान मा. मोदीजींच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे गरिबांना त्यांचा हक्क मिळला असून जनतेचा विश्वास मोदीजींवर वाढला आहे.
ModiAt9 या महाजनसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर ‘संपर्क से समर्थन’ या अभियानांतर्गत माध्यम समूह भेटी.
ModiAt9 या महाजनसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर ‘संपर्क से समर्थन’ या अभियानांतर्गत काल प्रदेशाध्यक्ष मा.श्री. Chandrashekhar Bawankule जी यांच्यासोबत सकाळ माध्यम समुहाच्या कार्यालयात राज्यभरातील सर्व आवृत्ती प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. या चर्चेत पंतप्रधान मा.श्री. Narendra Modi जी यांच्या नऊ वर्षांच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणच्या कार्यकाळाची माहिती देत चालू राजकीय, सामाजिक स्थिती आणि घडामोडीं यावरही चर्चा करण्यात आली. दैनिक 'पुण्यनगरी' च्या पुणे कार्यालयाला पुण्यनगरीचे संचालक भावेश शिंगोटे यांनी पुण्यनगरीचा वाचक वारसा सांगितला त्यावेळी त्यांचे आजोबा आणि या या वृत्तसमूहाचे प्रमुख स्व. बाबा शिंगोटे यांच्या आठवणी ताज्या झाल्या. यावेळी भावेश यांना पुस्तक भेट देत मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या कामकाजावर चर्चा करण्यात आली.
G20 प्रदर्शनास केंद्रीय शिक्षणमंत्री मा.धर्मेंद्र प्रधान जी यांनी भेट.
G20 च्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात आयोजित प्रदर्शनास केंद्रीय शिक्षणमंत्री मा.धर्मेंद्र प्रधान जी यांनी भेट दिली आणि विविध स्टॉलवरील नावीन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी विद्यापीठातील सहकाऱ्यांशीदेखील चर्चा केली.
आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव संकुलात G20 बैठकीसाठी उपस्थित देशांच्या प्रतिनिधींसाठी विशेष योगा कार्यक्रमाचे आयोजन
जी २० शिक्षण कृती गटाची चौथी बैठक पुण्यात सुरू आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव संकुलात G20 बैठकीसाठी उपस्थित देशांच्या प्रतिनिधींसाठी विशेष योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री मा. धर्मेंद्रजी प्रधान, पालकमंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह उपस्थित राहून योग शिबिरात सहभाग घेतला व शरीर, मन, चेतना आणि आत्मा यांना संतुलनात आणणाऱ्या योग साधनेचे महत्व समजून घेतले. योग संस्कृतीचे महत्त्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण विश्वाला पटवून दिले आहे. योग म्हणजे सुदृढ मन व निरोगी शरीराची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच सर्वांनी योग करून आपले आरोग्य सांभाळावे.
केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास मंत्री मा.धर्मेंद्र प्रधान जी यांचे पुण्यात स्वागत.
G20 परिषदेच्या चौथ्या शैक्षणिक कार्यगटाच्या तसेच शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीसाठी केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास मंत्री मा.धर्मेंद्र प्रधान जी हे आज पुण्यात आले असता, त्यांचे पुणे विमानतळावर पुणेरी पगडी देऊन स्वागत केले.
G20 परदेशी प्रतिनिधींची पुण्यातील वारसास्थळांना भेट.
पुण्यात सुरू झालेल्या जी20 शैक्षणिक कार्य गटाच्या बैठकीच्या आजच्या दिवशी सकाळी परदेशी प्रतिनिधींनी पुण्यातील वारसास्थळांच्या भेटीचा अनुभव घेतला. पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा, लाल महाल आणि नानावाड्याची त्यांनी पाहणी केली. यावेळी ढोल लेझीमच्या निनादात पाहुण्यांचे स्वागत करून स्थानिक लोककलांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. शनिवारवाड्याची संपूर्ण माहिती आणि लाल महालाशी संबंधित छत्रपती शिवरायांचा बालपणीचा गौरवशाली इतिहास परदेशी पाहुण्यांनी आस्थेने जाणून घेतला. शनिवारवाड्याची भव्यता बघून आणि छत्रपतींचे शौर्य ऐकून परदेशी पाहुणे भारावून गेले. ऐतिहासिक आगाखान पॅलेसला भेट देताना कस्तुरबागांधी आणि महादेवभाईदेसाई यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन परदेशी पाहुण्यांनी अभिवादन करत महात्मा गांधी आणि या वास्तूशी निगडित घटना व इतिहास जाणून घेतला. परदेशी प्रतिनिधींनी छायाचित्रे काढून घेऊन आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न केला.
G20 परिषदेसाठी उपस्थित जगभरातील प्रतिनिधींचे पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात, महाराष्ट्रीयन शैलीत स्वागत.
वसुधैव कुटुंबकम ! आज सकाळी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या हेरिटेज कॅम्पसमध्ये G20 4thEdWG परिषदेसाठी उपस्थित जगभरातील प्रतिनिधींचे पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात, महाराष्ट्रीयन शैलीत स्वागत केले.
G-20 अंतर्गत सुरू असलेल्या मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र या प्रदर्शनाला महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा.दीपक केसरकर जी यांनी भेट.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात G-20 अंतर्गत सुरू असलेल्या मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र या प्रदर्शनाला महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा.दीपक केसरकर जी यांनी आज भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी त्यांच्याशी विविध राज्यातील शैक्षणिक पद्धतीवर चर्चा झाली.
आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांचा "मन की बात" हा कार्यक्रम केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री मा.अन्नपूर्णा देवी यांच्यासोबत ऐकला.
आज भांडारकर इन्स्टिट्यूट या ठिकाणी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री मा.अन्नपूर्णा देवी व माजी खासदार श्री.प्रदीपदादा रावत आणि शिवाजीनगर मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समवेत देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्र मोदी जी यांचा "मन की बात" हा कार्यक्रम ऐकला. आज 'मन की बात' मध्ये मोदीजींनी शिवरायांच्या योगदानाचा गौरव करत समस्त देशवासीयांना प्रत्येक क्षेत्रात शिवरायांना आदर्श ठेऊनच कार्य करावं, असा संदेश दिला.
जी २० शैक्षणिक कार्यगट परिषदेच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुरू असलेल्या प्रदर्शनाला केंद्रिय शिक्षा राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या सोबत भेट दिली.
जी २० शैक्षणिक कार्यगट परिषदेच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुरू असलेल्या प्रदर्शनाला केंद्रिय शिक्षा राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या सोबत भेट दिली. या प्रदर्शनात विविध राज्यांनी आपापल्या राज्यांमध्ये पायाभूत साक्षरता तसेच संख्याशास्त्र या क्षेत्रातील सादर केलेल्या सर्वोत्कृष्ट पद्धती बघण्याची संधी मिळाली.
जी-२० परिषदेच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज 'पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र' याविषयीच्या चर्चासत्राचे आणि प्रदर्शनाचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती. अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते.
जी-२० परिषदेअंतर्गत चौथ्या शैक्षणिक कार्यगटाच्या बैठकीच्या अनुषंगानं आजपासून पुण्यात विविध कार्यक्रमांची सुरुवात होत आहे. या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज 'पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र' याविषयीच्या चर्चासत्राचे आणि प्रदर्शनाचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती. अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते. तीन ते नऊ वर्षे वयागटोतल्या मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम होण्यासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र शिक्षण पद्धती आणि त्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन शैक्षणिक साधनांचा या प्रदर्शनात समावेश आहे. दोन दिवस चालणाऱ्या या सत्रांमुळे शिक्षणासाठी प्रगतीशील मार्ग तयार करण्यात मदत होईल.
केंद्रीय शिक्षा राज्यमंत्री श्री.सुभाष सरकार यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट
G20 च्या चौथ्या शैक्षणिक कार्यगट बैठकीच्या अनुषंगाने केंद्रीय शिक्षा राज्यमंत्री श्री.सुभाष सरकार यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट दिली. यावेळी त्यांचे विद्यपीठातर्फे स्वागत करत विविध विषयांवर चर्चा केली. आजच्या भेटीत त्यांनी विद्यापीठात सुरू असलेल्या तयारीची पाहणी करत कामकाजाचा आढावा घेतला. तसेच जी२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजीत प्रदर्शनाची देखील त्यांनी पाहणी केली.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री हिंदुत्ववादी नेते मा.केशव प्रसाद मौर्य यांचा पुणे दौरा
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री हिंदुत्ववादी नेते मा.केशव प्रसाद मौर्य दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांची पक्ष कार्यालयात भेट घेतली. मोदी @ ९ या विशेष जनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने पुणे लोकसभा मतदारसंघात त्यांचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. यावेळी त्यांच्याशी मोदी सरकारने नऊ वर्षात केलेल्या विकास कामांची तसेच सरकार आणि संघटनेशी संबंधित विषयांवर चर्चा करून माध्यमांना याची माहिती दिली.
G20 ची चौथी शैक्षणिक कार्यगटाच्या बैठकीच्या अनुषंगाने पुण्यातील सर्व शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी आणि संस्था चालक यांची बैठक
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. याच विद्येच्या माहेरघरात G20 ची चौथी शैक्षणिक कार्यगटाची बैठक पुढील आठवड्यात होत आहे. त्या अनुषंगाने आज पुण्यातील सर्व शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी आणि संस्था चालक यांची बैठक पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. लोकसहभागातून ही परिषद यशस्वी करायची असल्यामुळे सर्वांनी एकत्रितरित्या ही परिषद यशस्वी करुया, असे आवाहन यावेळी दादांनी केले. बैठकीत सर्व शिक्षण क्षेत्रातील कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. परिषदेच्या यशस्वीततेसाठी प्रतिनिधींनी आपापल्या सूचना मांडल्या.
विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या व सघटनांच्यावतीने आज माझा सत्कार
राज्यातील विविध विद्यापीठातील तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासनस्तरावर मार्गी लावण्यासाठी अथक प्रयत्न केल्याबद्दल विविध विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या व सघटनांच्यावतीने आज माझा सत्कार करण्यात आला. यावेळी हा सन्मान माझा नसून प्रत्येक विद्यार्थी, सेवक आणि पदाधिकाऱ्यांचा हा सन्मान आहे अशी भावना व्यक्त केली. तसेच सेवक कृती समितीच्या सदस्यांना संघटित होऊन शक्ति स्थापित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. संघटित झाल्यामुळेच शासकीय स्तरावर सदस्यांच्या मागण्या पूर्ण होतात हे सांगितले, आणि १९९३ च्या विराट मोर्चाचे उदाहरण दिले. सेवक कृती समितीने सत्कार केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद..!
वारी Y-20:युवा संवाद व पंचप्रण" व 'स्वच्छ वारी स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी' दिंडीचे प्रस्थान
राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय सेवा योजना , विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे ते पंढरपूर आषाढीवारी निमित्ताने जी२० कार्यक्रमांतर्गत आयोजीत राज्यस्तरीय "वारी Y-20: युवा संवाद व पंचप्रण" व 'स्वच्छ वारी स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी' दिंडीचे प्रस्थान आज अतिशय भक्तिमय वातावरणात पुणे विद्यापीठातून करण्यात आले. यावेळी दिंडीत सहभागी होत, पालखी नाचवत सहकाऱ्यांसोबत फुगडीचा देखील आनंद लुटला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थ राष्ट्र घडविण्यासाठी पंचप्रण सांगितले आहेत. वारीच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे पंचप्रण जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचवतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तर्फे गेल्या ५-७ वर्षापासून 'स्वच्छ वारी- स्वस्थ वारी- निर्मल वारी- हरित वारी' हा समजाभिमुक उपक्रम राबवला जात आहे. पालखी मार्गात विविध ठिकाणी भारुड, पथनाट्य आणि इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीचे, प्रबोधनाचे काम केले जाते. पुणे विद्यापीठ असे एकमेव विद्यापीठ असेल जो असा उपक्रम राबवित आहे. याचा अभिमान असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि यशस्वी स्किल्स लि. तर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘कमवा आणि शिका’ योजनेचा शुभारंभ
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि यशस्वी स्किल्स लि. तर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘कमवा आणि शिका’ योजनेचा शुभारंभ आज पालकमंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाला माझ्यासह माजी मंत्री राजेश टोपे, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर, यशस्वी ग्रुपचे चेअरमन विश्वेश कुलकर्णी, प्रतापराव पवार, मोटर्सचे व्यवस्थापन सल्लागार गजेंद्र चंदेल आदी उपस्थित होते. यशस्वी स्किल्स सोबत इतरही संस्थांना ही योजना राबविता यावी यासाठी लवकरच धोरण आणले जाईल असे मत चंद्रकांतदादांनी व्यक्त केले. सोबतच यशस्वीने या योजनेचे आदर्श मॉडेल तयार करावे आणि उद्योगांनी ही योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
मोदी @ ९ जनसंपर्क अभियानाअंतर्गत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन
पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी @ ९ जनसंपर्क अभियानाअंतर्गत आज शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र येथे माजी लोकसभा सदस्य आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी श्री.जयभान सिंह पवैया यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यानिमित्ताने जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनीही याला उत्तम प्रतिसाद दिला.
G20 परिषदेच्या चौथ्या शिक्षण कार्य गटाचे चर्चासत्र नियोजन बैठक
G20 परिषदेच्या चौथ्या शिक्षण कार्य गटाचे चर्चासत्र १९ ते २१ जून दरम्यान पुण्यात होत आहे. जनभागीदारीचा हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ होस्ट करत आहे. या परिषदेच्या अनुषंगाने आज पदाधिकाऱ्यांसोबत विद्यापीठात सुरू असलेल्या विविध कामांची तयारी, नियोजन आणि इतर कामकाजाचा आढावा घेण्यात आला. २२ जून २०२३ रोजी शिक्षण मंत्रिस्तरीय बैठकीने या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
महाराष्ट्र सहप्रभारी मा.श्री. जयभान सिंह पवैया पुणे दौरा
"मोदी ॲट नाईन" जनसंपर्क अभियानाअंतर्गत माजी लोकसभा सदस्य तथा महाराष्ट्र सहप्रभारी मा.श्री. जयभान सिंह पवैया पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी प्रदेश कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. गेली ९ वर्ष भारताच्या नवनिर्माणाची, गरीब कल्याणाची नऊ वर्ष आहेत. देशाला महासत्ता बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी आपला प्रत्येक क्षण समर्पित केला आहे. या नऊ वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा त्यांनी पत्रकार परिषदेत मांडला.
जगद्गुरू संत तुकारामांच्या जीवनावर आधारित ‘आनंदडोह – आनंदवारी’ प्रयोगाचे उद्घाटन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत, संवाद पुणे तर्फे देहू हून पंढरपूर ला जाणाऱ्या वारी सोबत जगद्गुरू संत तुकारामांच्या जीवनावर आधारित ‘आनंदडोह – आनंदवारी’ हा योगेश सोमण यांचा एकपात्री प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन देहू येथे झाले. पालखी मार्गावर ९ जून ते २१ जून २०२३ दरम्यान याचे प्रयोग होणार आहेत.
दिल्लीत पुण्याच्या पत्रकार चमूची भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. जे. पी. नड्डा जी यांची सदिच्छा भेट
आज दिल्लीत पुण्याच्या पत्रकार चमूने Bharatiya Janata Party (BJP) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. J.P.Nadda जी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री.Vinod Tawde जी हे देखील उपस्थित होते. पुण्यात होणाऱ्या G20 च्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील नवनवीन घडामोडी आणि उपक्रमांबद्दलची माहिती होण्यासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्याची मौल्यवान संधी 'पुणे एज्युकेशन फोरम' ने मिळवून दिली त्याबद्दल नड्डाजींनी संस्थेचे कौतुक तसेच अभिनंदन केले. देशातील खूप कमी लोक सामाजिक दृष्टिकोण समोर ठेवून निस्वार्थीपणे काम करतात ही खूप मोठी कौतुकास्पद बाब असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. नड्डाजी यांच्यासारखे थोर व्यक्तिमत्व जेव्हा कौतुकाची थाप देतात त्यावेळी अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.
माजी केंद्रीय मंत्री श्री.प्रकाशजी जावड़ेकर यांची भेट
भारतीय जनता पक्ष कार्यालय दिल्ली येथे आज आपल्या पुण्याचे असलेले माजी केंद्रीय मंत्री श्री.प्रकाशजी जावड़ेकर यांची भेट घेतली. आपल्या मातीतील माणूस दिल्ली सारख्या राजधानीत भेटतो त्यावेळीचा आनंद फार वेगळाच असतो. यावेळी जावडेकर साहेबांनी मोदी सरकारने गेल्या ९ वर्षात केलेल्या महत्वपूर्ण कामांबबत चर्चा केली. मोदीजी यांचे असलेले व्हीजन भारताला कसे महासत्ता बनविण्यासाठीचे पाऊल आहे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. त्याची झलक जगानं जी- २० परिषदेत पाहिली आहेच. तसेच नवे शैक्षणिक धोरण हे उद्याचा समर्थ भारत घडवण्याची क्षमता असणारे धोरण कसे आहे याविषयी त्यांनी चर्चा केली.
पत्रकारांच्या दिल्ली दौऱ्यात शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव श्री.संजयजी कुमार आणि उच्च शिक्षण विभागाचे सचिव श्री. के संजय मूर्ती यांच्याशी पत्रकारांची एकत्रित बैठक
G20 या बैठकीत G20 च्या पूर्वी झालेल्या शिक्षण कार्यगटाच्या बैठका, तसेच पुण्यात होणारी चौथी बैठक याविषयी चर्चा करण्यात आली. पूर्वीच्या बैठकातून मिळालेले फलित आणि आगामी बैठकीची तयारी याविषयी कुमारजी आणि मूर्तीजी यांनी माहिती शेअर केली. त्याचबरोबर काही सूचना असतील तर त्या मांडाव्यात असेही मत त्यांनी व्यक्त केले. सोबतच नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसे सर्वसमावेशक धोरण आहे, या धोरणामुळे भारतातील शिक्षणाच्या भविष्यासाठीच्या दृष्टीकोनाची रूपरेषा त्यांनी मांडली.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री.विनोद जी तावडे यांची दिल्ली दौऱ्यात त्यांच्या निवासस्थानी पुण्यातील पत्रकारांच्या टीमसह भेट.
माझे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासूनचे मित्र आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री.विनोद जी तावडे यांची दिल्ली दौऱ्यात त्यांच्या निवासस्थानी पुण्यातील पत्रकारांच्या टीमसह आवर्जून भेट घेतली. यावेळी विनोदजींनी संपूर्ण पत्रकार समूहाशी मनमोकळेपणाने राजकीय तसेच शिक्षण क्षेत्राशी निगडीत अनेक विषयांवर चर्चा केली. विनोदजींनी महाराष्ट्रात शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद हातळल्यामुळे शिक्षण विषयाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यांच्या सोबत झालेल्या चर्चेतून मा.नरेंद्रजी मोदी यांचे शिक्षण क्षेत्राविषयीचे धोरण कसे शिक्षण क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जाणारे आहे याची माहिती मिळाली.
डॉ. विनयजी सहस्रबुद्धे यांची भेट
दिल्ली दौऱ्यामध्ये भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे(Indian Council For cultural Relations) डॉ. विनयजी सहस्रबुद्धे यांची भेट घेतली. या भेटीत आपली भारतीय संस्कृती आणि इतर विविध देशांतील सांस्कृतिक क्षेत्र आशा प्रगल्भ विषयावर चर्चा झाली.
'पुणे एज्युकेशन फोरम' चा पत्रकारांसाठी दिल्लीचा अभ्यास दौरा
पुण्यातील शिक्षणतज्ज्ञांच्या 'पुणे एज्युकेशन फोरम' या संस्थेच्यावतीने पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुणे शहरातील शैक्षणिक बीट सांभाळणाऱ्या पत्रकारांसाठी दिल्लीचा दोन दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित केला आहे.
पत्रकारांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नवनवीन घडामोडी आणि उपक्रमांबद्दलची माहिती होण्यासाठी तसेच आपल्या शहराव्यतिरिक्त इतर शहरातील प्रतिष्ठित आणि नामवंत शिक्षण संस्था आणि व्यक्तींशी संवाद साधण्याची मौल्यवान संधी उपलब्ध करून देणे हा या अभ्यास दौऱ्याचा उद्देश आहे.
त्या अनुषंगाने आज सर्वप्रथम विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ऑफिसला भेट दिली. याभेटीत आयोगाचे अध्यक्ष प्रा.मामिदला जगदेश कुमार व सचिव प्रा.मनिष जोशी यांनी शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवर पत्रकार समूहाशी सखोल चर्चा केली. पत्रकरांना या दिल्लीच्या अभ्यास दौऱ्यातून नक्कीच मौल्यवान अनुभव मिळतील याची खात्री आहे. त्यांचा अनुभव येणाऱ्या काळात नक्कीच पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरेल.
भारतीय जनता पार्टीच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनील कांबळे आयोजित भव्य नोकरी महोत्सव
'भारतीय जनता पार्टीच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंडित दीनदयाळ उपाध्याय भव्य नोकरी महोत्सव व छत्रपती शाहू महाराज करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. Chandrakant Patil यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी माझ्यासह राज्याचे माजी राज्यमंत्री मा.दिलीपभाऊ कांबळे, पुणे शहराध्यक्ष मा. Jagdish Mulik , महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद विकास रोजगार मार्गदर्शन केंद्राचा अधिकारी वर्ग आदी उपस्थित होते.
यावेळी माझ्या भाषणात येत्या काळात भारत हा जगातला सगळ्यात जास्त तरुणांचा देश राहणार आहे आणि जगातले युरोप, अमेरिका, आफ्रिका यांसारखे देश म्हातारे असणार आहेत. म्हणजेच आपलं भारतीयांचं सरासरी वय २५ होणार आहे. त्यामुळे पुढची पंधरा वर्ष भारतीय तरुणांना प्रचंड मोठी संधी उपलब्ध होत आहे. आख्या जगाला माणसांची गरज लगणार आहे, ती गरज पूर्ण करण्याची संधी भारताला मिळणार आहे आणि तुम्ही सर्व तरुण मुलं याचे शिलेदार असणार आहात. पंतप्रधान मा. Narendra Modi त्याप्रकारे नियोजन करीत आहेत, कौशल्यविकास च्या माध्यमातून प्रशिक्षण देत आहेत. या सर्व संधीचं तुम्ही सोनं करा असे मत मांडले. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेचे आमदार मा. MLA Sunil Kamble यांचे अभिनंदन केले आणि इतका चांगला कार्यक्रम घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.
आजच्या या महारोजगार मेळाव्यात तरुणांना विविध क्षेत्रातील नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे. या नोकरी महोत्सवामध्ये जवळपास ८० कंपन्यांमार्फत साधारणतः दहा हजार नोकऱ्यांची उपलब्धता मिळणार आहेत.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगगुरू स्वामी रामदेव बाबा काल पुण्यात आले असता मित्रवर्य विशाल चोरडिया यांच्या घरी त्यांची सदिच्छा भेट घेतली.
९ वर्षं देशाच्या प्रगतीची, ९ वर्षं मोदी सरकारची! शिरूर लोकसभा पत्रकार परिषद
'मोदी @ ९’ या महाजनसंपर्कअभियान च्या अंतर्गत आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांचा दौरा मा. केंद्रीयमंत्री श्री. प्रल्हाद सिंह पटेल व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय जी टंडन यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पार पडला.
आजच्या दिवसाच्या अखेर खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात पटेल साहेबांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यात मोदी सरकारच्या सेवेची ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेवा, सुशासन आणि गरीबकल्याण साठी आमच्या सरकारच्या यशासह केंद्र सरकारची धोरणे आणि योजनांबद्दल माहिती त्यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील वडगांव कोशिंबेग या गावातील कळमजाई देवी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आयोजित आंबेगावकेसरी बैलगाडा शर्यतीत उपस्थित राहिलो.
आजच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील ‘मोदी @ ९’ या महाजनसंपर्क अभियान च्या दौऱ्यावर असताना आंबेगाव तालुक्यातील वडगांव कोशिंबेग या गावातील कळमजाई देवी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आयोजित आंबेगावकेसरी बैलगाडा शर्यतीत उपस्थित राहिलो. या निमित्ताने मोठ्या काळानंतर बैलगाडा मालकांच्या आनंदात सहभागी होण्याचा योग आला.
मा. केंद्रीयमंत्री श्री. प्रल्हाद सिंह पटेल व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय जी टंडन हे हा थरारक खेळ प्रकार बघून भारावून गेले होते. या खेळाच्या न्यायालयीन लढाईत उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचे मोठे योगदान आहे याची प्रल्हादजी आणि संजयजी यांना आठवण करून दिली.
मा. केंद्रीयमंत्री श्री. प्रल्हाद सिंह पटेल व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय जी टंडन यांच्या उपस्थितीमध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये लाभार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन
देशभर सुरू असलेल्या ‘मोदी @ ९’ या महा जनसंपर्क अभियानाच्या आजच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील दौऱ्यात मा. केंद्रीयमंत्री श्री. प्रल्हाद सिंह पटेल व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय जी टंडन यांच्या उपस्थितीमध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये लाभार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात उपस्थित राहून वेगवेगळ्या भागांमधील संघटनात्मक आढावा, पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्यांच्या भेटीगाठी व संवाद साधला. तसेच पक्ष कार्यासंबंधी विविध मुद्दे सहकाऱ्यांसमवेत शेअर केले. मोदी सरकारच्या विविध योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यात याव्यात या दृष्टीने मार्गदर्शन केले.
महाजनसंपर्क अभियान अंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री जलशक्ती विभाग मा.प्रल्हाद सिंह पटेल जी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आज शिरूर लोकसभेतील खेड तालुक्यात आदिवासी मेळावा संपन्न
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात मोदी सरकारच्या कार्यकाळाला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपतर्फे ‘मोदी @ ९’ हे महाजनसंपर्क अभियान देशभर राबविले जात आहे.
या अभियानाच्या अनुषंगाने केंद्रीय राज्यमंत्री जलशक्ती विभाग मा.प्रल्हाद सिंह पटेल जी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आज शिरूर लोकसभेतील खेड तालुक्यात आदिवासी मेळावा संपन्न झाला. यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित होतो. सोबत राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय जी टंडन देखील उपस्थित होते.
मोदी सरकारच्या देशहिताच्या, विकासाच्या व लोककल्याणाच्या योजना व कार्य कार्यकर्त्यांनी घरोघरी जनसंपर्क करून सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी मार्गदर्शन केले.
Modi@9 महा जनसंपर्क अभियान: नियोजन आणि आगामी काळातील रूपरेषा ठरविण्यासाठी पुणे शहर व जिल्हा कार्यसमिती बैठक घेण्यात आली.
मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात केंद्रात भाजप सरकारला ९ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने आज पुणे शहर व जिल्हा कार्यसमिती बैठक घेण्यात आली. या बैठकीत "महा जनसंपर्क अभियानाचे" नियोजन आणि आगामी काळातील रूपरेषा ठरवण्यात आली.
माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जी-२० परिषदेअंतर्गत पुण्यात आयोजित शैक्षणिक उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलले ‘पंचप्रण’ हे देशातील युवापिढीने एकतेने आचरणात आणले, तर अशा युवापिढीच्या मदतीने बलशाली भारताची निर्मिती होणे शक्य आहे,” असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने पुण्यात केला.
राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन दिवसांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जी-२० परिषदेअंतर्गत पुण्यात आयोजित शैक्षणिक उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच जी-२० विषयक माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही या वेळी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यस्तरीय “राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशन” आणि जी-२० परिषदेनिमित्ताने पुण्यात नजिकच्या काळात आयोजित शैक्षणिक उपक्रमांसाठीच्या उपक्रम अनावरण समारंभ
राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशन आणि जी-२० परिषदेनिमित्ताने पुण्यात नजिकच्या काळात आयोजित शैक्षणिक उपक्रमांसाठीच्या उपक्रम अनावरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते कऱण्यात आले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजयकुमार, सहसचिव अर्चना अवस्थी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आणि इतर मान्यवर आणि राज्यभरातून आलेले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.
उपस्थित कार्यक्रम अधिकाऱ्यांशी संवाद साधताना चंद्रकांत दादा पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून आगामी काळातील शिक्षण उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याबद्दलच्या अपेक्षा व्यक्त केल्या. तर केसरकर यांनी "देशात श्रमाला प्रतिष्ठा मिळाल्यास, देशातील युवक हे केवळ देशासाठीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही कुशल मनुष्यबळ म्हणून उपयुक्त ठरू शकतील", असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी मनोगत व्यक्त करण्याची संधी मलाही मिळाली. यावेळी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट केला. पुण्यात होणाऱ्या जी-२० एज्युकेशन समिटमध्ये अपेक्षित विविध उद्दिष्टांविषयी राज्यभरातील युवकांना माहिती मिळावी आणि त्यासाठीचे काम या अधिवेशनातून होणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तरुणांमध्ये समाजसेवा, देशसेवा आणि एकात्मतेविषयीची जनजागृती निर्माण केली जाते. त्यामुळे हे अधिवेशन हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. युवकांमध्ये देशाच्या विकासाविषयी आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना या विकासप्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आयोजित युवा संवाद संपर्क अभियान याचाच एक भाग आहे. या माध्यमातून राज्यभरात युवकांची एक वेगळी चळवळ सुरू होईल याबद्दल विश्वास वाटतो.
आमचे सहकारी मित्रवर्य प्रा.डॉ.संजीव सोनवणे सर यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तर्फे त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सन्मान सोहळ्यास उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...!
भाजपा प्रदेश कार्यसमिती बैठकीत आभार प्रदर्शन करण्याची संधी मिळाली.
सामान्य माणसाच्या भाजपा कार्यकर्त्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद ठेवत सेवाभाव वृत्ती जोपासली पाहिजे, असे मार्गदर्शन काल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जे. पी. नड्डा जी यांनी केले. 'संवाद' भाजपच्या संघटनेचा पाया आहे.
काल पुण्यात माननीय नड्डाजींच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात भाजपा प्रदेश कार्यसमितीची बैठक पार पडली. या कार्यसमिती बैठकीत आभार प्रदर्शन करण्याची संधी मला मिळाली. देशहितासाठी सदैव कार्यरत राहणाऱ्या पक्षामध्ये मी सक्रिय कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान आहे.
पुण्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे.पी.नड्डाजींच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात भाजपा प्रदेश कार्यसमितीची बैठक पार पडली.
यावेळी माननीय नड्डाजींकडून बूथ संरचना, संघटनात्मक कार्य याबाबत सकारात्मक मार्गदर्शन मिळाले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली समाजातील प्रत्येक घटकाला समृद्ध आणि सक्षम करताना सर्वसमावेशक विकासाची राजकीय संस्कृती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आणि एनडीएचे आपले सहकारी भारताच्या या विकासाच्या प्रवासाला शिखरावर नेण्यासाठी कटिबद्ध आहेत.
बैठकीला राष्ट्रीय महामंत्री विनोदजी तावडे, महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी, पंकजा मुंडे, शिवप्रकाशजी, ओमप्रकाश धुर्वे, जयभानसिंह पवैया, तरुण चुग, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, मुंबई प्रांताध्यक्ष आशीष शेलार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुनील देवधर, विजया रहाटकर, आमदार, खासदार आणि इतर मान्यवर तसेच बहुसंख्येने कार्यकर्ता आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बूथ सशक्तीकरण अभियानाचा आढावा, केंद्रातील मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीतील कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीचे जनसंपर्क अभियान याची घोषणा करण्यात आली. तसेच संघटनात्मक विस्तारासाठी विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व वरिष्ठ नेत्यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन सर्वांसाठीच नवसंजीवनी देणारे आहे. एक वेगळी ऊर्जा या सत्रातून मिळाली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जून महिन्यात G20 ची शैक्षणिक विषयावर परिषद होत आहे. या परिषदेच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी आणि परिषदेसंदर्भात विविध बैठकांचे आयोजन करण्यासाठी विद्यापीठात सचिवालय कार्यालय स्थापन करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन काल करण्यात आले.
भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरचा पहिला संघटनात्मक दौरा जळगाव येथे होतोय. त्यानिमित्ताने पक्ष पदाधिकाऱ्यांच्यावतीने स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामकाजासंदर्भात जळगाव दौऱ्यावर आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरचा पहिला संघटनात्मक दौरा जळगाव येथे होतोय. त्यानिमित्ताने पक्ष पदाधिकाऱ्यांच्यावतीने स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
यावेळी खा.रक्षाताई खडसे, खा.उन्मेष पाटील, आ.मंगेश चव्हाण,डॉ.राजेंद्र फडके, आमदार राजूमामा भोळे, स्मिताताई वाघ, अजय भोळे, अशोक कांडेलकर, पोपटतात्या भोळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जळगाव ही माझी जन्मभूमी, इथूनच ४० वर्षांपूर्वी माझ्या संघटनात्मक कामाला सुरुवात झालेली. त्यामुळे घरच्या लोकांकडून मिळणाऱ्या या सन्मानाचे वर्णन मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. परंतु एवढे सांगू इच्छितो की, हा सन्मान माझ्या पुढील वाटचालीसाठी अधिक ऊर्जा देणारा आहे. या सन्मानाबद्दल आभार व्यक्त न करता त्यांच्या ऋणातच राहणे पसंत करेन.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे ‘एज्युकेशन वर्किंग ग्रुप’ ची बैठक होस्ट करत आहे. या बैठकीच्या नियोजनाच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थतीत पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत आज मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते.
जानेवारी महिन्यात झालेल्या जी-२० 'इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप’ च्या बैठकीचे यजमान पद पुण्याने यशस्वीपणे भूषविले आहे. याच पार्श्वभूमीवर १९ ते २२ जून दरम्यान तिसरी ‘डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप’ ची बैठक आणि चौथी ‘एज्युकेशन वर्किंग ग्रुप’ ची बैठक अशा दोन्ही बैठकांचे नियोजन पुणेकरांच्या सहकार्याने पुन्हा एकदा होत आहे.
पुण्याची ओळख जशी सांस्कृतिक पुणे आहे, औद्योगिक पुणे आहे तसं पुणे हे शिक्षणाचे मोठं केंद्र देखील आहे. पुणे हे जगातलं मोठं एज्युकेशनचं हब आहे. त्यामुळेच आपण पुण्याला 'ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट' म्हणतो. एज्युकेशन ग्रुपमध्ये केवळ संस्था येत नाहीयेत, तर जगातल्या ३० देशांचे शिक्षणमंत्री पुण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्याला जगामध्ये शैक्षणिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आणि शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याकसाठी एक प्रचंड मोठी संधी आहे. यामुळेच या बैठकीत सर्व शैक्षणिक संस्थांचा समावेश करुन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेनुसार नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करु आणि ही बैठक यशस्वी करु, अशी ग्वाही यावेळी दिली.
यावेळी केंद्रीय शिक्षण विभागाच्या सहसचिव निता प्रसाद, अर्चना शर्मा, जी-२० चे समन्वयक विपीन कुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळे, प्रा. प्रफुल्ल पवार, रवी शिंगणपूरकर, प्र-कुलगुरू संजीव सोनावणे यांच्यासह पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल कोथरूड विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुख यांची बैठक पार पडली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल कोथरूड विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुख यांची बैठक पार पडली. आगामी काळात लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका अशा सर्व प्रकारच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या अनुषंगाने कोथरूड मधील प्रत्येक नागरिकांची नोंदणी सरल ॲपवर करण्याचे आवाहन यावेळी बावनकुळेजी यांनी केले. त्यांच्या आवाहनानुसार आजपासूनच कामाला लागण्याचा संकल्प यावेळी सर्व बूथ आणि शक्तीकेंद्र प्रमुख तसेच पदाधिकाऱ्यांनी केला.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष झाल्याबद्दल माझा सत्कार देखील प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
भारतीय जनता पक्ष, पुणे शहर मधील बुथ प्रमुखांच्या मार्गदर्शनपर बैठक प्रदेशाध्यक्ष मा. श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी बावनकुळे साहेबांनी प्रदेश उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल माझे अभिनंदन केले, आणि भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टी, कसबा विधानसभा मतदारसंघातील बुथ प्रमुखांची बैठक प्रदेशाध्यक्ष मा. श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आज पार पडली. या बैठकीला उपस्थित राहून संघटनात्मक रचनेचा आढावा घेतला. यावेळी सरल ॲपच्या माध्यमातून कार्यकर्ते व नागरिकांपर्यंत कसे पोहोचता येईल याचे विश्लेषण करण्यात आले.
बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुथ सशक्तिकरण, केंद्र आणि राज्याचे विविध उपक्रम आणि कार्यक्रम प्रत्येक घरात पोहोचवण्याच्या सूचना तसेच विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.
"G20 ची उपयुक्तता आणि भारत" या विषयावर आंतरविद्याशाखीय शिबिराचे चांदवाद, नाशिक येथे आयोजन
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या आबड लोढा जैन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "G20 ची उपयुक्तता आणि भारत" या विषयावर आंतरविद्याशाखीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना सांगितले की,"G-20 भारताला विश्वगुरू होण्याची फार मोठी संधी आहे. तरुणाईला यातून फार मोठा वाव आहे. भारताची ताकद ही विश्वाच्या पटलावर सिद्ध करण्याची संधी आहे. यामुळे आपल्या संस्कृतीचे आणि परंपरेचे जागतिक पातळीवर महत्व पटवून देता येईल. बलाढ्य राष्ट्रांच्या या संघटनेत भारताला आपले प्रभुत्व सिद्ध करता येईल." यावेळी G-20 आणि भारत या विषयावरील संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन देखील करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सल्लागार परिषदेची पहिली सभा.
नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करावयाचे कार्यक्रम आणि जागतिक स्पर्धेत आपला नावलौकिक टिकवत अधिक उंची गाठण्यासाठी प्रयत्न अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठ सल्लागार परिषदेची बैठक झाली. यावेळी विद्यापीठाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकने, संशोधन, बौद्धिक स्वामित्व हक्क आणि नवीन उपक्रम, आंतरराष्ट्रीयकरण, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योगांशी परस्पर सहकार्य व संशोधन अनुदान तसेच विद्यापीठ अमृतमहोत्सव व जी २० आयोजनाच्या माध्यमातून विद्यापीठाचा नावलौकिक उंचावणे या महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून योजना आखण्यावर भर देण्यात आला व त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली. उद्योगपती संजय किर्लोस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस उपस्थित राहून चर्चेत सहभागी झालो. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.नरेंद्र जाधव, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभवी, माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञ राज शेखर जोशी, कुलगुरू डॉ.कारभारी काळे आदी सदस्य उपस्थित होते.
मॉडर्न विकास मंडळ, पुणे या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
मॉडर्न विकास मंडळ, पुणे या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सलग ३२ संस्था हा उपक्रम राबवत आहे. या शिबिराचे उदघाटन आज माझ्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी रक्तदान केलेल्या मान्यवरांना प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या.
"मन की बात" चा ऐतिहासिक १०० वा भाग
'मन की बात' बनला देशाचा आवाज! देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या "मन की बात" चा ऐतिहासिक १०० वा भाग आज प्रसारित झाला. या ऐतिहासिक पर्वाचे साक्षीदार होण्यासाठी मी सामूहिकरित्या हा संवाद ऐकण्याचे आयोजन केले होते. तेथे मोठ्या संख्येने नागरिकांनी मोदीजींचे मौल्यवान विचार ऐकले व कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता. मन की बात हे अनेक भारतीयांसाठी प्रेरणा आणि प्रोत्साहनाचे माध्यम बनले आहे. मन की बात च्या माध्यमातून देशातील सामान्य माणसाशी संवाद साधून प्रधान सेवक कसे अतूट नाते निर्माण करू शकतात याचा अनुभव मला आला.
SAKSHAM 2023 AUTO/CAR रॅली या उपक्रमाचे उद्घाटन
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड(MNGL) ने आयोजित केलेल्या SAKSHAM 2023 AUTO/CAR रॅली या उपक्रमाचे उद्घाटन माझ्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांच्या नेतृत्वात हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी भारताने २०७० सालापर्यंत नेट झिरो(NetZero) म्हणजे शून्य कार्बनचे (ZeroCarbonEmmission) लक्ष्य गाठण्याचा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने ऊर्जेची बचत, शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी संरक्षण यासाठी सक्षम-२०२३ हा उपक्रम केंद्र सरकारच्यावतीने हाती घेण्यात आला आहे.
तिसरी एज्युकेशन वर्किंग ग्रुप (EDWG) बैठक, भुवनेश्वर
भारताच्या G20 च्या अध्यक्षतेखालील तिसरी एज्युकेशन वर्किंग ग्रुप (EDWG) बैठक भुवनेश्वर येथे गेले दोन दिवसापासून सुरू आहे. या बैठकीत सहभागी झालो. या वेळी आयोजित 'फ्यूचर ऑफ वर्क' प्रदर्शनाला देखील भेट दिली. जिथे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पना पाहता आल्या. या प्रदर्शनामध्ये उद्योग, शैक्षणिक संस्था, सरकारी संस्था, बहुपक्षीय एजन्सी, स्टार्टअप आणि इतर संस्था यांचा सक्रिय सहभाग आहे. आम्हा सहभागी लोकांना ओडिसाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा अनुभवण्याची आणि राज्याच्या इतिहास आणि परंपरांबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी यावेळी मिळाली. शैक्षणिक क्षेत्रात जागतिक बदल घडवून आणण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना आणि धोरणांवर चर्चा आणि अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने यापूर्वी चेन्नई आणि अमृतसर येथे या कार्यगटाच्या बैठका झालेल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या मार्गदर्शनानुसार, भारत सरकार प्रामुख्याने शैक्षणिक आणि व्यावसायिक शिक्षणाच्या एकत्रीकरणाद्वारे कौशल्ये विकास, मूल्यांकन आणि मान्यताप्राप्त करण्याच्या पद्धतींवर पुनर्विचार करत आहे. असे मत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी मांडले.
योगीराज श्री सद्गुरु शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पालखी सोहळा
त्रैलोक्यनायक, योगीराज श्री सद्गुरु शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पालखी सोहळयात सहभागी होत श्री शंकर महाराजांना वंदन केले. हा पालखी सोहळा भाविकभक्त आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.
Meet Union Minister Dharmendra Ji Pradhan at 3rd Education Working Group Meeting
On the backdrop of scheduled G20 meeting to be held in June in Pune, I attended 3rd Education Working Group Meeting of G20 & an enlightening workshop on the theme “Future of Work: Skill Architecture and Governance Models of India and Singapore” at Bhubaneswar. Union Minister Dharmendra Ji Pradhan - a dynamic leader, have high hopes from Pune’s 4th Education Working Meeting of G20 to be held on 20, 21 June followed by G20 education ministers meeting. We discussed opportunities emerging from the Education Meetings. Shree Dharmendra Ji Pradhan also shared his views on skilling and expected Pune to take the G20 to the next level. His guidance is useful in arranging Pune Meetings. Have assured him the outcome of the G20 meetings shall make India’s education system a benchmark of the world.
'सहकार क्षेत्रातील युवकांचा सहभाग' या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पद्मश्री डॉ. विखे पाटील अध्यासन आणि नॅशनल युवा को ऑप सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 'सहकार क्षेत्रातील युवकांचा सहभाग' या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. नव्या तंत्रज्ञानात तरुण पिढी पुढे असते त्यामूळे त्यांच्या क्षमतांना चालना देऊन आपला देश जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने प्रगतीपथावर असल्याचे मत डॉ. कराड यांनी मांडले. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला तिसऱ्या स्थानावर पोहोचवण्यासाठी, युवा वर्गाला बरोबर घेऊन एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी नॅशनल युवा सोसायटीसारख्या संस्थानी काम करावे; यासाठी त्यांना नाबार्ड संस्थेशी जोडून देण्यात येईल याची ग्वाही त्यांनी दिली. आगामी काळात नॅशनल युवा को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सहकार्याने पुणे विद्यापीठात सहकार क्षेत्रातील संशोधन केंद्र सुरू केले जाईल अशी घोषणा प्र.कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनी यावेळी केली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार समितीचा समर्पण पुरस्कार अभिनेते श्री सयाजी शिंदे यांना देण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार समितीच्या वतीने देण्यात येणारा पहिला समर्पण पुरस्कार प्रसिध्द अभिनेते श्री सयाजी शिंदे यांना आज प्रदान करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री.रामदास आठवलेजी आणि पुण्याचे पालकमंत्री मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा पार पडला. कोणताही राजकीय नेता, नट किंवा शास्त्रज्ञ सावली देत नाही किंवा फळ ही देत नाही. त्यामुळे माझ्या मते झाड हा खरा सेलिब्रिटी आहे. झाड आपल्याला मरेपर्यंत ऑक्सिजन देते त्यामुळे आई आणि झाड यापेक्षा मोठं काही नाही. तसेच राजकारणात कितीही पक्ष आले तरी आपण झाडांच्या पक्षावर प्रेम करूया कारण झाडांचा पक्ष टिकणारा आहे, असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई संस्थेच्या या वृक्षारोपणाच्या कामाला हातभार म्हणून गुवाहाटी आयआयटी, आसामच्या धर्तीवर पुण्यात पहिली 'ट्री अॅम्ब्युलेन्स' सुरू करणार असल्याची घोषणा ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. तसेच सह्याद्री देवराई या संस्थेवर एक फिल्म बनवणार असल्याचे ही जाहीर केले. तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी शिकवलं आहे की पक्ष, जात, धर्म, पंथापेक्षा देश महत्वाचा आहे, अन् देश वाचवायचा असेल तर झाडं वाचवली पाहिजेत. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. सदानंद मोरे म्हणाले, वृक्ष हा संपूर्ण पर्यावरणाचा पाया आहे. त्याचे आपण रक्षण केले तर पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. आज ज्या डॉ. बाबासाहेब यांच्या नावाने पुरस्कार दिला जात आहे, त्यांनी सादर केलेल्या 'इंडियन रूपीज' या प्रबंधाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. ज्यावेळी कोणी भारतीय चलनावर फारशी चर्चा करत नव्हतं अशा वेळी डॉ. बाबासाहेबांनी तो प्रबंध लिहिला. या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने त्या विषयीची एक चित्रफीत तयार करावी. ज्यामुळे डॉ. बाबांसाहेबांच्या योगदानाची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल. Sfs
भारतीय जनता पार्टी, पुणे शहरच्या वतीने आज ‘भाजपा संघटनात्मक महाबैठक’ चे आयोजन
महाबैठकीत बूथ सशक्तीकरणाचा निर्धार! भारतीय जनता पार्टी, पुणे शहरच्या वतीने आज ‘भाजपा संघटनात्मक महाबैठक’ चे आयोजन करण्यात आले होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत बुथ सशक्तिकरण अभियानासह भाजपा संघटनात्मक कार्याचा आढावा, संघटना विस्तार यावर बावनकुळे साहेबांनी केलेले मार्गदर्शन खूप मोलाचे होते. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन आणि पक्षाचे सर्व उपक्रम कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने राबविण्याचे आवाहन देखील बावनकुळे साहेबांनी केले. पुणे शहरात भारतीय जनता पार्टी संघटनात्मक पातळीवर मजबूत असून ती अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी बैठकीत एकमुखाने करण्यात आला.
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात इमामवाडा येथे 'रोजा इफ्तार चे आयोजन
सर्वसमावेशक भाजप: राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुण्यात इमामवाडा येथे 'रोजा इफ्तार ' आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुस्लिम व ज्यू समाज बांधवांनी एकत्रित रोजा इफ्तार करुन उपवास सोडला. अल्पसंख्यक समुदायाची प्रगती हीच देशाची प्रगती आहे. यासाठी पंतप्रधानांच्या धोरणानुसार आम्ही कार्यरत आहोत असे विचार राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांनी यावेळी व्यक्त केले. भाजप हा देशातील एक क्रमांकाचा पक्ष आहे, या पक्षात अल्पसंख्यकांना यावेसे वाटते, त्यांचे स्वागतच आहे, असे आवाहन देखील त्यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान मुस्लिम, ज्यू, पारसी, इराणी व ख्रिश्चन समाजातील जवळपास दोन हजार मान्यवर व्यक्तींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच इकबाल सिंह यांच्या हस्ते राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सल्लागार पदी अली दारूवाला यांची नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३२ वी जयंती. बाबासाहेबांनी भारतीय समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा क्रांतिकारी संदेश दिला. त्यांच्या विचारांनी माझ्यासारख्या लाखो तरुणांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या विचारांचे अनुसरण केल्याने अनेक तरुणांचे जीवन बदलले. त्यांनी दिलेला 'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते घेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही' या मंत्राची आठवण आजच्या दिवशी झाल्याशिवाय राहत नाही. कारण यातूनच प्रेरणा घेऊन मी गेली ४० वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. आजच्या जयंतीनिमित्त पुणे स्टेशन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच एकतेचा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने 'लोकसहभागातून लोकसेवा' या तत्त्वावर 'भव्य एकता मिसळ' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला भेट देऊन सर्व कार्यकर्त्यांसह मिसळचा आस्वाद घेतला.
"राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक आणि संचालक राज्यस्तरीय कार्यशाळा"
राष्ट्रीय सेवा योजना(NSS), उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक आणि संचालक राज्यस्तरीय कार्यशाळा" आज पुणे येथे पार पडली. या कार्यशाळेसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन मिळाले. यावेळी समन्वय समिति सदस्य म्हणून उपस्थित राहत विचार व्यक्त केले. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी आगामी २५ वर्षांसाठी 'पंचप्राण' कार्यक्रम देशासमोर ठेवला आहे; या विषयाशी अनुसरून भारताचा इतिहास, संस्कृती, परंपरा, एकता या विषयीचे प्रचार आणि प्रसाराचे कार्य घेऊन राज्यातील सर्व महाविद्यालयांपर्यंत पोहाचायचे आहे असे मत मांडले. त्यासाठी 'पंचप्राण:युवा परीचर्चा' हा कार्यक्रम राबवायचा आहे त्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव श्री.मनीष जोशी यांच्याशी संवाद आणि सत्कार
शैक्षणिक धोरणात होत असणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव श्री.मनीष जोशी यांच्याशी संवादाचे तसेच त्यांची माजी विद्यार्थी संघाच्या मानद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला. त्यावेळी त्यांनी जागतिक पातळीवरील भारतातील उच्च शिक्षणाची भूमिका कशी महत्वाची आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये यासाठी कसे बदल केले आहेत याविषयी संवाद साधला.
भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहन
आज भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त पुणे शहर कार्यालयात भाजपाच्या पदाधीकाऱ्यांसह ध्वजारोहन करून स्थापना दिवस साजरा केला. तसेच पक्षकार्यात ज्यांचे मोलाचे योगदान मिळाले आशा दिवंगत नेत्यांना अभिवादन करत उपस्थित पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांना शुभेच्छा दिल्या. सोबतच आजच्या स्थापना दिवसाच्या औचित्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठीचा मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांचा गतिमान आणि प्रेरणादायी संवाद ऐकला.
पुण्यनगरीचे भाजपचे खासदार आणि आमचे जेष्ठ नेते, मार्गदर्शक गिरीशजी बापट यांना श्रद्धांजली.
पुण्यनगरीचे भाजपचे खासदार आणि आमचे जेष्ठ नेते, मार्गदर्शक गिरीशजी बापट यांची मृत्यूशी झुंज अखेर आज संपली. भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी बापटसाहेब एक प्रमुख नेते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते तब्बल चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेल्या राजकीय कारकिर्दीत ते १९९५ पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले. प्रकृती खालवलेली असताना देखील ते कसबा पेठ पोटनिवडणुकीत व्हिलचेअरवरून प्रचाराच्या मैदानात उतरले होते. त्यांची पक्षासाठीची एकनिष्ठता आणि तळमळ आदर्शवत होती. बापटसाहेबांच्या जाण्याने माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते पोरके झाले आहेत. बापटसाहेबांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगात आम्ही सारे सहभागी आहोत. ओम शांती...
देशाचे संरक्षण मंत्री मा.श्री.राजनाथ सिंहजी हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांचे स्वागत केले.
भारत आणि आफ्रिकी देशांच्या लष्कर प्रमुखांच्या परिषदेच्या निमित्ताने आज देशाचे संरक्षण मंत्री मा.श्री.राजनाथ सिंहजी हे पुणे दौऱ्यावर आले असता त्यांचे विमानतळावर स्वागत केले.
गुढीपाडवा, हिंदू नववर्ष निमित्ताने सकल हिंदु समाज गोखलेनगर आयोजित हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेत सहभागी
ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ! प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !! आज चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, हिंदू नववर्ष प्रारंभ. या निमित्ताने सकल हिंदु समाज गोखलेनगर आयोजित हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेत सहभागी होत आनंदोत्सव साजरा केला. हिंदू नववर्ष व गुडीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनी अभिवादन
पाहुनी शौर्य तुझ पुढे मृत्यु हि नतमस्तक झाला,स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभुराजा अमर झाला.🚩 फाल्गुन अमावस्या अर्थात मृत्युंजय अमावस्या, चाळीस दिवस काळाला हि दरदरुन घाम फोडणाऱ्या नृसिंह शिवप्रभुंचा छावा, स्वराज्याचे धाकलं धनी, स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिन. या बलिदान दिनी छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी, पुणे च्या 'माणिक महोत्सव' समारंभाचे उद्घाटन पालकमंत्री
खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी, पुणे च्या 'माणिक महोत्सव' समारंभाचे उद्घाटन पालकमंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहून मार्गदर्शन केले. यावेळी खडकी शिक्षण संस्था आजपर्यंत कशी संवेदनशीलपणे काम करत आहे हे सांगितले. आगामी काळात नव्या शैक्षणिक धोरणातील बदलामुळे तरुणांना कशी संधी उपलब्ध होणार आहे, आणि त्या संधीचे सोने करण्यासाठी जी२० च्या मध्यमातून कसे व्यासपीठ तयार होत आहे याची माहिती दिली.
भाजप पुणे शहर शिष्टमंडळाची पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री.विक्रमकुमार यांची भेट
भारतीय जनता पार्टी पुणे शहर शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री.विक्रमकुमार यांची भेट घेतली. पुढील वर्षी सादर होणाऱ्या महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांच्या हितासाठी काही योजना आणि तरतुदींचा समावेश करावा याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली व त्याची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. यात मेट्रो, बीआरटी, रस्ते, पीएमपीएमएल, पाणीपुरवठा, नदीसुधारणा, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, उद्याने, पर्यावरण, शिक्षण, क्रीडा, समाविष्ट गावे, परवडणारी घरे, स्मार्ट सिटी, वारसा प्रकल्प, स्मारके, जी20, समाजकल्याण, विद्युत आशा जवळपास १९ महत्वाच्या बाबींचा आणि त्याअंतर्गत इतर विविध विकास कामांचा समावेश आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, येरवडा विभागातर्फे आयोजित 'छात्र चेतना' हे विद्यार्थी संमेलनात विद्यार्थी मित्रांशी संवाद
जर मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो नसतो तर.. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, येरवडा विभागातर्फे आयोजित 'छात्र चेतना' ह्या विद्यार्थी संमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन आज माझ्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला. यावेळी जर मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो नसतो तर माझ्या गावातच राहिलो असतो असे स्वतःचे उदाहरण देत अभाविप मुळे आयुष्याला कशी कलाटणी मिळाली हे सांगितले. माझ्या प्रमाणे तुमच्याही आयुष्याला एक वेगळी दिशा, एक वेगळे व्यासपीठ या मध्यमातून मिळेल हा विश्वास व्यक्त केला. तसेच जगाच्या डेमोग्राफी चक्रामध्ये येत्या काळात भारत हा जगातला सगळ्यात जास्त तरुणांचा देश राहणार आहे आणि जगातले युरोप, अमेरिका, आफ्रिका यांसारखे देश म्हातारे असणार आहेत. म्हणजेच आपलं भारतीयांचं सरासरी वय २५ होणार आहे. त्यामुळे पुढची पंधरा वर्ष भारतीय तरुणांना प्रचंड मोठी संधी उपलब्ध होत आहे. आख्या जगाला माणसांची गरज लगणार आहे, ती गरज पूर्ण करण्याची संधी भारताला मिळणार आहे. त्यामुळेच पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलेलं आहे. असे सांगत नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत कसा आमूलाग्र बदल घडणार आहे याविषयी मार्गदर्शन केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) च्या वतीने आयोजित G20 या विषयावरील चर्चासत्रात विचार व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) च्या वतीने श्रीमती सीमा कांबळे यांनी लिहलेल्या २५ महिला उद्योजकांच्या कथांचा समावेश असलेले 'यशस्विनी:उद्योजिकांच्या यशोगाथा' हे पुस्तक श्रीमती नयना सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थतीत होतो. यावेळी आयोजित G20 या विषयावरील चर्चासत्रात विचार व्यक्त केले. भारताला मिळालेले G20 चे अध्यक्षपद प्रत्येक भारतीयासाठी कसे महत्वाचे आहे यावर मत मांडले. जी२० मध्ये भारताचे योगदान आणि सर्वसामान्यांना जी२० चा लाभ याविषयी माहिती सांगितली. महिला, शेती, उद्योजक, युवक अशा अनेकविध समाजघटकांना यानिमित्ताने संधी उपलब्ध होत आहेत. जगातील सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणून भारत उदयास आला आहे. त्यामुळे भारतातील तरुणांना अधिकाधिक संधी निर्माण होत आहेत. जी२० च्या माध्यमातून या संधीचे सोने करणाची वेळ आलेली आहे. आज भारत अमृतकाळातून जात आहे, भविष्यात भारत हा जगाचे नेतृत्व करणार आहे, भारत विश्वगुरू बनण्याचे जी२० हे प्रवेशद्वार आहे. पंतप्रधान मा.नरेंद्र मोदींजींनी सांगितल्याप्रमाणे भारतात जी२० लोकचळवळ झाली पाहिजे. भारतात ५६ शहरात २०० ठिकाणी या माध्यमातून लोकचळवळ उभी राहिली पाहिजे. मोदीजींची आत्मनिर्भर भारताची संकल्पना पूर्ण करण्यासाठी, जागतिक पातळीवर त्यांचे हात बळकट करण्यासाठी या लोकचळवळीत सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी केले.
ऐतिहासिक निकाल: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची निवडणूक बिनविरोध !
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच व्यवस्थापन परिषदेसारख्या अतिउच्च अधिकार मंडळावर सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही सर्व टीम नक्कीच सकारात्मकदृष्ट्या काम करेल, याची खात्री आहे. सर्व नवनियुक्त व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा..!
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०:अभ्यासक्रम निर्मिती आणि अंमलबजावणी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभाग आणि इंटर्नल क्वालिटी इम्प्रूव्हमेंट सेल (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०:अभ्यासक्रम निर्मिती आणि अंमलबजावणी" या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन आज माझ्या हस्ते करण्यात आले.
कसबा पेठ निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शहरातील वेगवेगळ्या मतदानकेंद्रांवर जाऊन आढावा घेतला.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. शहरातील वेगवेगळ्या मतदानकेंद्रांवर जाऊन आढावा घेतला. आपला कार्यकर्ता समर्पण भावनेतून काम करत जबाबदारी उत्तमरित्या पार पाडात आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदान आणि अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदान आणि अनुचित घटना टाळण्यासाठी जिजामाता शाळा तांबट आळी, लोणार आळी, दारुवाला पोलीस चौकी शेजारील मतदान केंद्र, गुजराथी शाळा या मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त देण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. सोबतच यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आहे.
यावेळी माझ्यासह शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरीताई मिसाळ, प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कर्जतकर आदी उपस्थित होते.
कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या समाजाच्या स्नेहमेळाव्यास उपस्थिती
कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या निमित्तानं आज सकल नाभिक समाज,पुणे शहर यांच्या स्नेहमेळाव्यास प्रदेशाध्यक्ष मा.आ.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासह उपस्थित राहिलो. यावेळी या समूहाने भाजप युतीचे उमेदवार हेमंत रासने यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला. त्याबद्दल सर्व नाभिक समाजबांधवांचे आभार आणि धन्यवाद!. नाभिक समाजाच्या विविध मागण्यांच्या महाराष्ट्र शासनाकडून पूर्तीसाठी नक्कीच ठोस पावले उचलली जातील याचा विश्वास आहे.
गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची 'सरहद' संस्थेच्या माध्यमातून पुणे येथे वास्तव्यास असलेल्या जम्मू-काश्मीर मध्ये वीरमरण आलेले जवान आणि पोलिस यांच्या मुलींची भेट.
आपको देखके मेरी थकान दूर हो गई' ! या शब्दात अमितभाई शहांनी विद्यार्थीनींशी संवाद साधला.
आज देशाचे लोकप्रिय गृहमंत्री मा. #अमितभाई_शाह यांनी 'सरहद' संस्थेच्या माध्यमातून पुणे येथे वास्तव्यास असलेल्या जम्मू-काश्मीर मध्ये वीरमरण आलेले जवान आणि पोलिस यांच्या मुलींची भेट घेतली, त्यांच्याशी मनमोकळेपणा संवाद साधला. काश्मिरी विद्यार्थीनींसाठी तयार करण्यास आलेल्या वसतिगृहाच्या कामाबाबत त्यांना माहिती देण्यात आली.
जम्मु व कश्मिरमधील मुला-मुलींच्या शिक्षण, रोजगारासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. तुम्हीही चांगले शिक्षण घ्या आणि मोठे व्हा' अशा शब्दात शहा यांनी विद्यार्थीनींना प्रोत्साहीत केले
श्री.हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ बोहरी समाजबांधवांची भेट
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने भाजपचे उमेदवार श्री.हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आज बोहरी समाजबांधवांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या असलेल्या समस्या, अपेक्षा जाणून घेत सकारात्मक चर्चा झाली.
गिरीशभाऊंची तळमळता
कसबा विधानसभा मतदारसंघात खासदार गिरीश भाऊ बापट आणि कसबा विधानसभा मतदार संघाच्या दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांच्या कामाची छाप इथल्या लोकांवर आहे. प्रकृती आस्वास्थ्यमुळे भाऊ प्रत्यक्ष मैदानात येवू शकत नाहीत. परंतु भाजपाचा हिंदुत्वाचा विचार विकास आणि राष्ट्रीयत्वाशी नाते सांगणारा आहे. आणि म्हणूनच सारा कसबा सदैव भाजपाला साथ देत आलेला आहे. यामुळेच कसबा म्हणजे भाजपा, कसब्यात कमळच हे समीकरण अभेद्य आहे, अजेय आहे. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा अशा प्रत्येक निवडणुकीत तुमचे पाठबळ भाजपालाच राहिले आहे. याविषयी मी कृतज्ञ आहे!
अशा शब्दात त्यांनी या पोटनिवडणुकीत आपण हेमंत रासने यांच्या पाठीशी आहोत आणि कसब्याची जनताही त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहणार आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. गिरीश भाऊंच हे पत्र वाचून कार्यकर्ता म्हणून एक प्रकारे बळ मिळालं आणि कसब्यात कमळच उमलेल याचा विश्वास दृढ झाला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी पुणे दौऱ्यावर असताना कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.
निवडणुकीची तयारी बघता शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार हेमंत रासने हे नक्कीच मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. युतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह त्यांनी निवडणुकीबद्दल चर्चा करून सूचना दील्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज आदरणीय खासदार गिरीशजी बापट यांचीही भेट घेतली. बापट साहेबांच्या तब्येतीची विचारपूस केली. बापट साहेबांनीही त्यांना निवडणुकीत युतीच्या विजयाचा विश्वास दिला.
प्रचार शुभारंभ !
कसबा पोटनिवडणुकीतील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार श्री.हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज वनमंत्री मा.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि पालकमंत्री मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. तत्पूर्वी श्री ओंकारेश्वरांचे दर्शन घेऊन महाआरती करत मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले. हेमंत रासने हे सत्तेसाठी नाहीतर सत्य आणि विकासासाठी लढणार आहे, असा विश्वास मुनगंटीवार साहेबांनी व्यक्त केला आहे. यावेळी मोठ्या माझ्यासह प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरीताई मिसाळ, गणेश बिडकर आदींसह बहुसंख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी म्हणून निवडणुकीत काम करण्याच्या दृष्टिकोनातून दोन दिवस शहरात कार्यकर्त्यांच्या नियोजनात्मक बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. यात प्रभाग क्रमांक १५, १८, १९ आणि २९ मधील कार्यकर्त्यांना प्रचाराच्या अनुषंगाने लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, स्लीप पावत्या, याद्या, कॉम्प्युटर,अत्याधुनिक यंत्रणा, डिजिटल साहित्य आदींसह इतर सर्वोतोपरी मदत पुणे शहर भाजपच्यावतीने केली जाईल असे अश्वस्त केले. याच बरोबर आपला पक्ष, उमेदवार श्री.हेमंत रासने आणि आपले चिन्ह कमळ हे शेवटच्या मतदारापर्यंत पोहचविण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या सूचना केल्या. श्री.हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाचा कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद, जल्लोष बघितला तेंव्हाच कसबा विधानसभा मतदारसंघात पुन्हा कमळच फुलणार हे अधोरेखित झाले.
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर बावणकुळेजी आणि पालकमंत्री मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला. आजचा कार्यकर्त्यांचा आणि पदधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून भाजपाच्या विजयाचा निर्धारच जणू व्यक्त झाला. तत्पूर्वी पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून आशीर्वाद घेण्यात आले.
पुण्यात सव्वा लाख विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्तीचा संकल्प! #EduYouthMeet मध्ये तरुणाईचा उत्स्फूर्त आणि उत्साही सहभाग !
'आर्ट ऑफ लिव्हिंग' फाऊंडेशनसह शहरातील शैक्षणिक संस्थांतर्फे झालेल्या ‘एज्युयूथ मीट’ या कार्यक्रमात ‘मी नशा करणार नाही आणि कोणालाही करू देणार नाही' हा आवाज तब्बल सव्वालाख मुखांतून घुमला. ही शपथ तरुणाईला देत होते आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरुवर्य श्री श्री रवीशंकर जी. या शपथेची नोंद 'लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' आणि 'एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. ‘जुने सोडून आयुष्यात काहीतरी नवे करा. तणावमुक्त राहा, त्यासाठी ध्यान आणि प्राणायम करा. खूष राहा अन् आपले स्वप्न जगा,’ असा सल्लाही गुरुजींनी यावेळी तरुणाईला दिला. श्री श्री रवीशंकर यांनी या कार्यक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि तणावमुक्त शिक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वर्षानुवर्षे आपण आंधळेपणाने शिक्षण घेत आहोत. व्यावहारिक आयुष्यात काहीच उपयोग होत नसलेल्या अभ्यासक्रमातील प्रचंड माहितीच्या ओझ्याने आपण दबले गेले आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील प्रतिभा जागृत करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण उपयोगी ठरेल. प्रत्येक विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था आनंदाचे, नवनिर्मितीचे कॅम्पस झाले पाहिजे. नवीन शैक्षिणक धोरण हे क्रांतिकारक पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश जी२० समितीने बनविलेल्या BJP4G20 या वेबसाइटचे अनावरण
महाराष्ट्र प्रदेश जी२० समितीने बनविलेल्या BJP4G20 या वेबसाइटचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस जी यांच्या शुभहस्ते आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडले. या कार्यक्रमावेळी प्रथम माझ्या प्रास्ताविकात या वेबसाईटचा उद्देश, जी20 मध्ये भारताचे योगदान, आणि सर्वसामान्यांना याचा कसा फायदा आहे याविषयी माहिती सांगितली. तसेच पंतप्रधान मा.नरेंद्र मोदींजींचे याविषयीचे vision सांगितले. जी20 चा लोगो आणि थीम या विषयीची माहिती सांगत त्याचा व्हिडिओ सादर करण्यात आला.
शैक्षणिक प्रदर्शन "क्रिएशन्स २०२३" चे उद्घाटन
यावेळी मार्गदर्शन करताना "आपला येथील उमेदवार हा कमळ आहे, आपण कमळासाठी कामाला लागुयात. मला वाटतं की हीच आपल्या पक्षाची खासियत आहे, आपण कार्यकर्ते आपल्या संघटनेसाठी, विचारासाठी आणि हे विचार ज्याच्यावर जगतो त्या चिन्हासाठी काम करतोय". या कमळाचा करिष्मा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तयार केलेला आहे. आजच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा जागतिक रेकॉर्ड झाला आहे. जवळपास 20-25 कोटी विद्यार्थी एकावेळी मार्गदर्शन ऐकत होते. जे विद्यार्थी हा कार्यक्रम ऐकत होते ते 2024 चे मतदार आहेत, हा मोदींजींच्या दुरदर्शीपणा आहे. ही विधानसभा आपणच जिंकणार हा विश्वास व्यक्त केला.
कसबापेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकी निमित्त मतदारसंघाची महाबैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी मार्गदर्शन करताना "आपला येथील उमेदवार हा कमळ आहे, आपण कमळासाठी कामाला लागुयात. मला वाटतं की हीच आपल्या पक्षाची खासियत आहे, आपण कार्यकर्ते आपल्या संघटनेसाठी, विचारासाठी आणि हे विचार ज्याच्यावर जगतो त्या चिन्हासाठी काम करतोय". या कमळाचा करिष्मा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तयार केलेला आहे. आजच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा जागतिक रेकॉर्ड झाला आहे. जवळपास 20-25 कोटी विद्यार्थी एकावेळी मार्गदर्शन ऐकत होते. जे विद्यार्थी हा कार्यक्रम ऐकत होते ते 2024 चे मतदार आहेत, हा मोदींजींच्या दुरदर्शीपणा आहे. ही विधानसभा आपणच जिंकणार हा विश्वास व्यक्त केला.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा "परीक्षा पे चर्चा" हा विद्यार्थीशी संवाद कार्यक्रम
"परीक्षा पे चर्चा हा विद्यार्थ्यांसाठी लाभदायक आहे. ही माझीही परीक्षा आहे आणि देशातील कोट्यवधी विद्यार्थी माझी परीक्षा घेत आहेत. अशा या परीक्षेसाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो.": पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा "परीक्षा पे चर्चा" हा विद्यार्थीशी संवाद कार्यक्रम खडकी शिक्षण संस्था येथे सामूहिकरित्या विद्यार्थ्यांसोबात ऐकत आनंद घेतला. या कार्यक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. बहुतांशी शाळांमध्ये टीव्ही स्क्रीन आणि संगणकावर युट्युब द्वारे हा कार्यक्रम दाखवला जात आहे. आपल्याप्रमानेच देशातील जवळपास २० ते २५ कोटी विद्यार्थी हा कार्यक्रम ऐकत आहेत. या कार्यक्रमाचा फायदा असा होत आहे की, मुलांचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढला आहे. यावर एक पुस्तक देखील निघालेलं आहे. मोदीजी जे मार्गदर्शन करतात ते आपल्या भविष्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी मानलावून मार्गदर्शन ऐकावे, असे सांगत सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो...!
भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेच्यावतीने लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्याचे सौभाग्य मिळाले. "आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आज आपण ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. येणाऱ्या २५ वर्षात आपल्याला आपल्या देशाच्या विकासासाठी फार मोठी संधी आहे. तरुणांनी या संधीचे सोने करणे गरजेचे आहे. यावर्षी आपला देश जी २० चे नेतृत्व करीत आहे हा देशाचा अभिमान आहे" असे उद्गार काढले. तसेच महाविद्यालयातील #NCC व #NSS च्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ठ पथसंचालन निमित्त विशेष अभिनंदन केले.
पुणे एज्युकेशन फोरम आयोजित "परदेशी विद्यापीठ:आव्हाने की संधी ?" चर्चासत्र
परदेशी विद्यापीठे भारतात येताहेत ही बाब स्वागतार्ह असून, त्याकडे एक संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. पुणे एज्युकेशन फोरमने "परदेशी विद्यापीठ:आव्हाने की संधी ?" या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. केंद्र सरकारने परदेशी विद्यापीठांना भारतात दारे खुले करण्याचा कायदा प्रस्तावित केला आहे. त्यासाठी सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे चर्चासत्र आयोजित केले होते. याप्रकरचे चर्चासत्र आयोजीत करणारे महाराष्ट्र हे बहुदा देशातील पहिलेच राज्य असावे. फोरमचा अध्यक्ष या नात्याने या चर्चासत्रातील सर्व तपशीलाचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करणार आहे. परदेशी विद्यापीठे भारतात येताहेत ही बाब स्वागतार्ह असून, त्याकडे एक संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी परदेशी विद्यापीठांना पायघड्या घालू नये. त्यांच्यासाठी काही नियमावली असणे तितकेच महत्त्वाचे आहे, असा सूर या शिक्षण तज्ञांच्या चर्चेतून निघाला. परदेशी विद्यापीठांचा विचार करताना आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था कशी सुधारेल, याकडे सर्वांनी लक्ष वेधले.
हिंदू जनआक्रोश मोर्चा : हुंकार हिंदुजनांचा !
एक दिवस फक्त धर्मासाठी..! सकल हिंदू समाजाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंच्या बलीदानाचे स्मरण संपूर्ण विश्वाला व्हावे म्हणून फाल्गुन अमावस्येला "धर्मवीर दिन" म्हणून घोषित व्हावा या प्रमुख मागणीसह गो-हत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा. या व इतर मागण्या संदर्भात आज शहरात भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. जय श्रीराम, जय हनुमान, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय च्या घोषणा देत हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या विचाराला स्मरून या राष्ट्र कार्यात सहकुटुंब सहभागी झालो. हा मोर्चा कोणत्या एका पक्षाचा नसून हिंदू धर्माविरोधी चाललेल्या कटकारस्थाना विरुद्ध आवाज उठवणारा होता. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व ज्ञात-अज्ञात सहभागी हिंदूंचे आभार.. 🚩 " हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व " 🚩
श्री क्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष, विद्वतरत्न प.पू.स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांचा ७५ वा वाढदिवस.
जय श्रीकृष्ण जय श्रीराम श्री क्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष, विद्वतरत्न प.पू.स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आळंदी येथील कार्यक्रमात उपस्थित राहून स्वामीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाचे औचित्य साधून १४५ देशांतील ७४ हजार गीता परिवारांनी हनुमान चालिसाचे ऑनलाइन पठण केले. यावेळी स्वामीजी अथक प्रयत्नांतून श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्मितीसोबतच हजारो, लाखों विद्यार्थ्यांना भारतीय वेदांचे शिक्षण देणारे राष्ट्र निर्मितीचे काम करत आहेत अशा भावना व्यक्त केल्या. येणाऱ्या काळात देशाचा अमृत मोहोत्सव सुरू होत आहे; यात शिक्षण क्षेत्रात खूप मोठा बदल होत आहे. आतापर्यंत आपल्याकडे इंग्रजांनी राबविलेली शिक्षण पद्धती सुरू होती. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात यात बदल होत आहे. आगामी काळात भारतात जे शिक्षण देण्यात येणार आहे ते हजारो वर्षाचे भारतीय संस्कार, विचार, परंपरा, वारसा यांचा समावेश असणार आहे. स्वामीजी हेच राष्ट्रहिताचे काम गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत. स्वामीजींनी निर्माण केलेल्या वेदशाळांमधून जे विद्यार्थी बाहेर पडतील ते नक्कीच भारताचे खरे राजदूत म्हणून ओळखले जातील असे विचार मांडले.
परदेशी पाहुण्यांना भारतीय पारंपरिक उत्पादनांची भूरळ!
#G20बैठकीसाठी पुण्यात आलेल्या परदेशी प्रतिनिधींचे खास महाराष्ट्र संस्कृतिने
स्वागत केले आणि संवाद साधला.
पाहुण्यांनी बैठकीस्थळी आयोजित पर्यटन दालनाला भेट दिली असता भारतीय पारंपरिक
उत्पादनाचं त्यांनी कौतुक केले.
भेटीवेळी त्यांना कोल्हापूरचा सेंद्रियरीत्या तयार केलेला गुळ भेट म्हणून दिला. यात
गुळांच्या Block, Candy, Powder अशा तीन प्रकारांचा समावेश होता. सोबतच पाहुण्यांना
सेंद्रिय गुळाचे आरोग्यासाठीचे महत्व, त्याचे फायदे, त्यातील पोषकतत्वे याची माहिती
देखील सांगितली. त्याचबरोबर जगभर लोकप्रिय असलेली सोलापुरी चादर देखील यावेळी
भेटस्वरूपात देण्यात आली. सोलपुरी चादर आपल्या अद्वितीय डिझाइन आणि टिकाऊपणासाठी
ओळखली जाते. आता सोलापूरच्या वस्त्रोद्योगाची ओळख फक्त चादरी पुरती मर्यादित
राहिलेली नसून टॉवेल, नॅपकिन्स, रुमाल, बेडशीट यांमध्ये देखील त्यांनी क्रांती
घडवलेली आहे. शक्यतो लोक पाहुण्यांचे स्वागत फुलांचा बुके देऊन करतात, पण आम्ही
सोलपुरी टॉवेलचा बनवलेला बुके भेट स्वरूपात देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.
त्यांच्यादृष्टीने ही नावीन्यकारक बाब होती.
जी २० च्या निमित्ताने पुण्यात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत
जी२० च्या निमित्ताने पुण्यात आलेल्या पाहुण्यांचे #पुणे विमानतळावर पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीने स्वागत केले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ही सुवर्णसंधी भारताला आणि आपल्या सर्वांना उपलब्ध होत आहे.
G20 परिषदेच्या निमित्ताने #सावित्रीबाईफुलेपुणेविद्यापीठ येथे जन भागीदारी कार्यक्रमाच्या अंतर्गत 'भविष्यातील शहरांसाठी' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन.
भविष्यातील शहरांसाठी शाश्वत उपायांचा अवलंब गरजेचा.. G20InPune परिषदेच्या निमित्ताने #सावित्रीबाईफुलेपुणेविद्यापीठ येथे जन भागीदारी कार्यक्रमाच्या अंतर्गत 'भविष्यातील शहरांसाठी' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या विषयाला अनुसरून नैसर्गिक आपत्ती, पर्यावरण आणि आर्थिक धोरण यावर माहितीचे आदान प्रदान, ग्रुप डिस्कशन आणि तज्ञांचे मार्गदर्शन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. जगातील एकूण लोकसंख्येच्या ५५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही शहरांमध्ये राहते, परंतु जगातील एकूण जागेच्या केवळ तीन टक्के जागेवर शहरी भाग आहे तरीही सर्वाधिक उत्पन्न याच शहरी भागातून मिळते, त्यामुळे शहरांच्या पायाभूत सुविधांवर भर द्यायला हवा. मात्र यासाठी तात्पुरते उपाय न करता शाश्वत उपायांचा अवलंब करावा असे मत तज्ञांनी व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांनी दिली.
जी-२० शिखर परिषद जनजागृती व संवाद कार्यक्रम
पुण्यात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या निमित्ताने #सावित्रीबाईफुलेपुणेविद्यापीठ च्या वतीने "जी-२० शिखर परिषद जनजागृती व संवाद" हा कार्यक्रम घेण्यात आला.पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री मा. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यापीठाच्या सर्व अधिसभा सदस्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. दादांनी #G20Summit साठी जगभरातल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी विद्यापीठाने केलेल्या जय्यत तयारीची पाहणी देखील केली #G20 च्या यशासाठी घेत असलेल्या परिश्रमासाठी आभार मानले. सोबतच "#आविष्कार-२०२३" स्पर्धेस भेट देऊन, या महोत्सवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली. तसेच या महोत्सवात सादर प्रकल्पांचे परिक्षण करणाऱ्या परिक्षकांचा सन्मान करुन संवाद साधला.
जी २० परिषद बैठकीच्या पार्श्वभूमीवर जन भागीदारी प्रकल्पाच्या माध्यमातून 'शहरी पायाभूत सुविधा' या विषयावरील चर्चासत्र
पुण्यात १६ आणि १७ जानेवारी रोजी होणाऱ्या जी २० परिषद बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि पुणे महानगरपालिका यांच्या सहयोगाने, जन भागीदारी प्रकल्पाच्या माध्यमातून 'शहरी पायाभूत सुविधा' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. या परिषदेत सहभागी होऊन पुणे शहराच्या विकासाचीदृष्टीने महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. हा कार्यक्रम एकूण चार सत्रात विभागाला गेला होता. -भविष्यातील शहरामनसाठीचे व्हिजन -महानगरपालिका वित्त पुरवठा व शहरी पायाभूत सुविधांचा विकास तसेच वित्त पुरवठ्यामध्ये सार्वजनिक खासगी भागीदारीची भूमिका - शहरी पायाभूत सुविधा व सेवा , संधी ,आव्हाने व उपाय आदि विषयांवर तज्ञांच्या उपस्थितीत चर्चा झाली. या कार्यक्रमासाठी केंद्र, राज्य तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांसह बांधकाम क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले होते.
महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन "अविष्कार -२०२३
#सावित्रीबाईफुलेपुणेविद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन "अविष्कार -२०२३" चे उद्घाटन महामाहीम राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी यांच्या हस्ते दुरदुष्य प्रणालीद्वारे पार पडले. या महोत्सवाच्या माध्यमातून देशात नव्या संशोधनाला चालना मिळेल आणि त्याद्वारे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राचे संचालक डॉ.मोहन वाणी, कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र.कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार,डॉ.संजय ढोले, सर्व अधिष्ठाता, शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
जी२० : भव्य जनजागृती रॅली !
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ(राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय छात्र सेना) आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जी-शिखर परिषदेसंदर्भात जनजागृतीकरीत आज सकाळी लाल महाल ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे भव्य जनजागृती रॅली चे आयोजन केले होते . या रॅलीची सांगता विद्यापीठात झाली. रॅलीच्या सांगता सभेवेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच तसेच राष्ट्रीय युवक दिनाचं औचित्य साधून "भारताचे जी२० अध्यक्षपद: संधी आणि आव्हाने व युवकांची भूमिका" या विषयावर राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे व्याख्यान झाले. ते आपल्या व्याख्यानात म्हणाले २०२३ हे वर्ष जी२० च्या माध्यमातून भारताचं जगतीक नेतृत्व प्रस्थापित करणारं वर्ष आहे. भारत आता आंतरराष्ट्रीय संघटनांचा अजेंडा ठरावतोय, भारत नियम बनवतोय आणि जग त्याचं अनुपालन करतंय हे #G20च्या माध्यमातून अनेकदा सिद्ध झाले आहे. जगातील सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणून भारत उदयास आला आहे. त्यामुळे भारतातील तरुणांना अधिकाधिक संधी निर्माण होत आहेत. जी२० च्या माध्यमातून या संधीचे सोने करणाची वेळ आलेली आहे. जी२० हे भविष्याला उज्ज्वल करण्याची मोठी संधी आहे. असे प्रस्तावनेत मत व्यक्त केले.
एज्यु यूथ मीट (#EduYouthMeet) कार्यक्रम पत्रकार परिषद
आजच्या स्पर्धेच्या युगात वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी मानसिक शक्तीची नितांत आवश्यकता आहे. मानसिक शक्ती वाढवून आणि व्यसनमुक्त राहून स्वत:ची व देशाची प्रगती साधण्याची प्रेरणा मिळावी, याकरिता एक लाख युवक पुण्यामध्ये एकत्र येणार आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनसह विविध नामवंत शैक्षणिक संस्थांच्या पुढाकाराने एज्यु यूथ मीट (#EduYouthMeet) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात गुरुदेव श्री.श्री.रविशंकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत कोथरुडमधील सूर्यकांत काकडे फार्म येथे होणार आहे. यावेळी युवकांमधील वाढत्या व्यसनाधिनतेकडे लक्ष वेधताना ३डी (3D) संस्कृतीत बदलाची आवश्यकता मांडली. Drugs, Drink and Disco हे 3D कल्चर बदलून आपल्याला तरुणांना Dedication, Devotion and Determination या 3D कडे न्यायचे आहे, अशी भूमिका मांडली.
१८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात "सरस्वतीच्या मंदिरात" या शैक्षणिक विषयीच्या परिसंवादात विशेष उपस्थित राहून साहित्य रसिकांशी संवाद
जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १८ वे जागतिक मराठी साहित्य संमेलन गेल्या 3 दिवसांपासून पिंपरी येथे सुरु आहे. संमेलनाच्या आजच्या शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील "सरस्वतीच्या मंदिरात" या शैक्षणिक विषयीच्या परिसंवादात विशेष उपस्थित राहून साहित्य रसिकांशी संवाद साधला. यावेळी भारताचे नवे शैक्षणिक धोरण तसेच परदेशी शिक्षण आणि भारत यांसारख्या विषयांवर विचार मांडले. देशात ७० वर्षे कारकुनी पद्धतीचे शिक्षण होते, आता धोरण बदलले आहे. त्यामुळे विदेशी विद्यापीठ देशात येणार आहेत. ही एक मोठी संधी आहे. यामुळे शिक्षणासाठी बाहेर जाणारा पैसा वाचणार आहे. दुसरीकडे शिक्षणापासून वंचित असलेली देशातील दहा कोटी मुले शिक्षण प्रवाहात आणायची आहेत. नवीन शैक्षणिक धोरणातून अनेक संधी उपलब्ध होणार आहेत, असे मत व्यक्त केले.
सावित्रीबाईफुले पुणे विद्यापीठ, पुणे अधिसभा(#Senate) व विद्यापरिषद (#Acadamic_Council) निवडणुकीचा शेवटचा टप्पा आज पार पडला. यानिमित्ताने शहरात विविध ठिकाणी मतदांकेंद्रांवर भेटी दिल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा(#Senet) व विद्यापरिषद(#Acadamic_Council) अहमदनगर जिल्हा निवडणुक प्रचार
#सावित्रीबाई_फुले_पुणे_विद्यापीठ अधिसभा(#Senet) व विद्यापरिषद(#Acadamic_Council) निवडणूक ८ जानेवारी रोजी होत आहे. या निमित्ताने नगर जिल्ह्याचा प्रचार दौरा केला. या प्रचार दौऱ्यात शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयास भेट दिली. त्याचबरोबर डॉ विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज, लोणी येथे प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थितीत शिक्षकांना होत असलेली निवडणूक आणि अधिकृत पॅनलची भूमिका तसेच उमेदवार यांच्याविषयी मार्गदर्शन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा(#Senet) व विद्यापरिषद(#Acadamic_Council) निवडणुक प्रचार .
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा(#Senet) व विद्यापरिषद(#Acadamic_Council) निवडणुकीच्या निमित्ताने 'विद्यापीठ विकास मंच'च्या सर्व उमेदवार प्रचारार्थ सिंहगड कॉलेज, जेएसपीएम कॉलेज आणि भांडारकर इंस्टीट्यूट येथे बैठकीचे आयोजन केले होते; यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकांच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. म्हणून यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (SPPUCTO), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शैक्षिक संघ, विद्यापीठ विकास मंच व अखिल भारतीय प्राचार्य महासंघ यांनी विद्यापीठाच्या हिताच्या दृष्टीने एकत्रितपणे निवडणूका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावेळी मनात राजकीय,सामाजिक असे कुठलेही वैर न ठेवता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडायची आहे असे आवाहन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा(#Senet) व विद्यापरिषद(#Acadamic_Council) नाशिक येथे निवडणुक प्रचार .
#सावित्रीबाईफुलेपुणेविद्यापीठ अधिसभा(#Senet) व विद्यापरिषद(#Acadamic_Council) निवडणूक ८ जानेवारी रोजी होत आहे. या निमित्ताने नाशिकचा प्रचार दौरा केला. या प्रचार दौऱ्यात रावसाहेब थोरात सभागृहात शिक्षक मतदार मेळावा घेण्यात आला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या दौऱ्यात गोखले एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख तथा शिक्षण महर्षी प्राचार्य डॉ.गोसावी सर यांची भेट घेतली. यावेळी विविध शैक्षणिक विषयावर गोसावी सरांशी मार्गदर्शनात्मक चर्चा झाली. या मार्गदर्शनाचा विद्यार्थी तसेच शिक्षक हितासाठी नक्कीच उपयोग होईल. सोबतच क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था, महात्मा गांधी विद्या मंदिर, के.के.वाघ शिक्षण संस्था आदि संस्थांना भेटी देऊन शिक्षण संस्थाचालक, शिक्षक मतदारांच्या भेटी घेतल्या.
महाराष्ट्रीय कलोपासक कें द्र, पुणेआयोजित पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ.
महाराष्ट्रीय कलोपासक केंद्र, पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत उपस्थित राहण्याचा योग आला. त्यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना माझ्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पुरुषोत्तम करंडक स्पर्धा भारतातील सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याची खरी ओळख आहे सांस्कृतिक चेहरा आहे. तसेच पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपणारी सातत्याने चालणारी स्पर्धा आहे. सलग इतकी वर्ष सातत्याने दर्जेदार स्पर्धा घेण्याबद्दल सर्व महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी कॉलेज, विद्यापीठांमधील युवक मोहोत्सवांबद्दल विचार व्यक्त केले. मध्यंतरीच्या काळात असे उत्सव बंद झाले होते याची खंत आहे. परंतु आता पुन्हा नव्या जोरदार प्रतिसादाने असे उत्सव सुरू झाल्याने समाधान वाटत आहे. हजारो विद्यार्थी सहभागी व्हायला लागलेत ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. विद्यार्थ्यांना केवळ डिग्री देणारी संस्था म्हणजे विद्यापीठ असू नये तर, विद्यार्थ्यांना सर्व व्यक्तिमत्त्व विकासाची संधी देणारे व्यासपीठ म्हणजे विद्यापीठ असावं या मताचा मी आहे. त्यामुळे विद्यापीठाने असे उपक्रम घेतले पाहिजेत.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो जरदारी याच्या विरोधात निषेध आंदोलन.
निर्लज्ज पाकिस्तान!
पाकिस्तान का भिखारी
बिलावल भुट्टो ज़रदारी
दहशवादाचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो जरदारी
याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आमच्या भारतीयांची शान माननीय पंतप्रधान श्री
नरेंद्र मोदीजी यांच्या विरुद्ध अतिशय हीन दर्जाची वक्तव्य केल्या प्रकरणी पुणे शहर
भाजप तर्फे भाजप प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या नेतृत्वात आणि
भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थतीत जाहीर
निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले.
'अर्हम दिव्यांग नॅशनल अवॉर्ड '२२
अर्हम फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने 'अर्हम दिव्यांग नॅशनल अवॉर्ड '२२ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित राहून दिव्यांग बांधवांना बक्षीस देवून अभिनंदन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुक श्रमपरिहार कार्यक्रम फर्ग्यूसन कॉलेजमध्ये संपन्न
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचाने दमदार विजय प्राप्त केला. या विजयात अहोरात्र काम करीत मोलाची भूमिका पार पाडणारे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, संघ परिवारातील सदस्य या सर्वांचा श्रमपरिहार कार्यक्रम काल फर्ग्यूसन कॉलेज मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ(तत्त्वज्ञान विभाग) आणि भक्तिवेदांत संशोधन केंद्र पुणे यांच्यात सामंजस्य करार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ(तत्त्वज्ञान विभाग) आणि भक्तिवेदांत संशोधन केंद्र पुणे यांच्यात आज सामंजस्य करार प्रा.डॉ.सदानंद मोरे आणि माझ्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या करारामुळे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान,कला, विज्ञान क्षेत्रात जागतिक दर्जाचा अभ्यास आणि संशोधनास चालना मिळेल असे मनोगत व्यक्त केले. यावेळी भक्तिवेदांत संशोधन केंद्रचे गौरांग प्रभू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे डॉ.विजय खरे, प्रा.श्रीधर आकाशकर, डॉ.जनार्दन चितोडे, डॉ.के.एन.धुमाळ, संजय भोसले आदी उपस्थित होते.
मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या निषेधार्थ आंदोलन
आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या निषेधार्थ आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुणे शहर भारतीय जनता पक्षातर्फे तीव्र आंदोलन करत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
नाशिक, पुणे जिल्ह्यातील नवनिर्वाचित प्रतिनिधींचा सत्कार समारंभ
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी नाशिक तर्फे आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर निवडून आलेल्या नाशिक, पुणे जिल्ह्यातील नवनिर्वाचित प्रतिनिधींचा सत्कार समारंभ माझ्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर कार्यक्रमात डॉ.अपूर्व हिरे, श्री.अशोक सावंत, डॉ.संपत काळे, डॉ.राजेंद्र भांबर, श्री.विजय सोनवणे, श्री.सागर वैद्य, श्री.बाकेराव बस्ते, श्री.राहुल पाखरे यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे च्या वतीने शहरातील विविध विधानसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या नवमतदार नाव नोंदणी व दुरुस्ती अभियानाला भेट
संगठन गढ़े चलो, सुपंथ पर बढ़े चलो
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे च्या वतीने शहरातील विविध विधानसभा मतदारसंघात
आयोजित केलेल्या नवमतदार नाव नोंदणी व दुरुस्ती अभियानाला भेट दिली. संपूर्ण शहरात
भाजयुमो राबवित असलेल्या या अभियानास तरुणांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. युवा
शक्ती ही लोकशाहीची ताकद आहे त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांना मोठ्या संख्येने
सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.
कला, क्रीडा आणि आरोग्य महोत्सव उद्घाटन
भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक हरीदास चरवड यांनी आपल्या ९ डिसेंबरच्या
वाढदिवसाच्या निमित्ताने आजच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून माधवबाग आणि
सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कला, क्रीडा आणि आरोग्य महोत्सव
आयोजित केला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज माझ्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या महोत्सवाच्या माध्यमातून हरीदास चरवड यांनी व्यक्तिमत्वाच्या सर्व अंगांना
स्पर्श केलेला आहे. त्यांनी कला, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रासंबंधी बहुआयामी
कार्यक्रम राबवून नागरिकांचे हीत जोपासले आहे.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून
शुभेच्छा दिल्या.
तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. डॉ.बाबासाहेबांनी
समाजातल्या शेवटच्या माणसाच्या सुखासाठी प्रयत्न केले, संघर्ष केला, अन्यायाविरुद्ध
लढण्याचा मार्ग दाखवला. चरवड यांचे आजच्या दिवशी या महोत्सवाचे आयोजन हे समाजात एक
चांगला संदेश देणारे आहे असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ज्ञानाच्या
अथांग महासागरास अभिवादन केले.!!
स्वररंग २०२२
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि भारतीय जैन संघटनेचे
कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने
विद्यापीठस्तरीय केंद्रिय युवक महोत्सव: स्वररंग २०२२ पार पडला.
या कार्यक्रमास उपस्थित राहून युवक महोत्सव राबिवल्याबद्दल सहभागी सर्व संस्था आणि
विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी माझ्या मार्गदर्शनात सांगितले की,
विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बहूआयामी व्हायचे असेल तर अभ्यासक्रमाबरोबर त्याला
शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे गरजेचे
आहे.
सिनेट सभासदांचा सत्कार आणि श्रमपरिहार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचच्या दमदार
विजयानंतर नवनियुक्त सिनेट सभासदांचा सत्कार आणि श्रमपरिहार कार्यक्रमाचे आयोजन
पालकमंत्री माननीय श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.
जगातील नामांकित अशा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कारभार ही फार मोठी
जबाबदारी आहे. भविष्यातील पिढी घडविणे म्हणजे राष्ट्र घडविण्याची जबाबदारी होय. अशी
महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडण्यासाठी आणि विद्यापीठाचा लौकिक वाढविण्याचे कार्य
करण्यासाठी सर्व नवनियुक्त सिनेट सभासदांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात
आल्या.
विद्यापीठ विकास मंच पहिल्यांदाच ताकदीने अधिसभेच्या निवडणूक रिंगणात उतरला होता.
आम्ही हे धाडस करू शकलो यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली ती आमच्या
अभाविपच्या कार्यकर्त्यांनी. राष्ट्रनिर्मितीच्या विचारांप्रती निष्ठा ठेवून पूर्व
नियोजन करून निवडणुकीत अचूक नियोजन अमलात आणून ही जबाबदारी या सर्वांनी एकत्रितपणे
सांभाळली. त्यांना भारतीय जनता युवा मोर्चा व पक्षातील सर्वच सहकाऱ्यांची बहुमूल्य
साथ मिळाली. संघटनशक्ती आणि अचूक नियोजनामुळे मिळालेले बळ आणि सगळ्या आस्थापनांचे
'टीम वर्क'यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला. यात छात्रशक्तीचा वाटा महत्वाचा आहे.
मी गेली ४० वर्ष विद्यार्थी, राजकीय, सामाजिक, शैक्षणीक जीवनात काम करतो आहे. उत्तर
महाराष्ट्र विद्यापीठ ते कालच्या सिनेट निवडणुकीपर्यंतच्या प्रवासात वेगवेगळ्या
निवडणूका अनुभवायला मिळाल्या. निवडणूक कोणतीही असो यात कार्यकर्त्यांचा, नेतृत्वाचा
आणि संघटनेचा कस लागतो. यातून घामाचे मोती होण्याचा अनुभव प्रक्रियेतील सगळ्यांनी
घेतला आहे. पडद्यामागचे, पडद्यावरचे असे सगळ्यांचे ट्युनिंग संघटना नावाचा धागा
जुळवतो. यातून, उमेदवार ठराविक असले तरी 'आपण सगळेच उमेदवार' ही भावना वाढीस लागते.
यातून जिंकण्याची शक्यता वाढते. याच समर्पित भावनेने काम केल्यामुळे या अधिसभेच्या
निवडणुकीनंतर मंचची वाढलेली ताकद प्रेरणा देणारी आहे. या सर्वांबद्दल आजच्या
सोहळ्यात कृतज्ञता व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
इंडियन जिओटेक्निकल सोसायटी(IGS), आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे(COEP)
इंडियन जिओटेक्निकल सोसायटी(IGS), पुणे चॅप्टर या संस्थेने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे(COEP) तंत्रज्ञान विद्यापीठासोबत कनेक्ट व सेलिब्रेट ही संकल्पना साकारली आहे. या संकल्पनेच्या बोधचिन्हाचा अनावरण सोहळा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडला. या समारंभाला उपस्थित राहून त्यांच्या कनेक्ट अँड सेलिब्रेट या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य प्रतिनिधी निवडणूक.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा (#सिनेट) निवडणुकीचा पुढचा टप्पा म्हणजे प्राचार्य प्रतिनिधी निवडणूक. यासाठी २७ नोव्हेंबर २०२२ रोजी खुल्या गटातील उमेदवार निवडीसाठी मतदान झाले. या प्राचार्य प्रतिनिधी प्रवर्गातील निवडणुकीचा निकाल आज (२९ नोव्हेंबर २०२२) जाहीर झाला. यात आमच्या डॉ.नितीन घोरपडे, डॉ.राजेंद्र भांबर, डॉ.प्रदीप दिघे, डॉ राजेंद्र झुंजारराव, डॉ. संपत काळे हे खुल्या गटातून निवडून आले आहेत. तसेच यापूर्वी प्राचार्य गटातील आरक्षित जागांवर डॉ. देविदास वायदंडे (एस.सी.प्रवर्ग), डॉ.वैभव दीक्षित (ओबीसी प्रवर्ग), डॉ.गजानन खराटे (एन. टी .प्रवर्ग), डॉ.क्रांती देशमुख (महिला प्रवर्ग) यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन ! विद्यापीठ विकास हेच ध्येय घेऊन कार्य करण्यासाठी भावी वाटचालीस विद्यापीठ विकास मंचच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचे यश.
विजय छात्र शक्तीचा.. जल्लोष विजयाचा....!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचा डंका..!
१० पैकी ९ उमेदवार विजयी..!
विद्यापीठ विकास मंचच्या भरघोस यशानंतर अभाविपच्या सहकाऱ्यांसोबत जल्लोष करत विजय
साजरा केला.
राष्ट्रनिर्माणाच्या या कार्याला या विजयाने अजून बळ मिळाले आहे.
देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथे भेट
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथे भेट झाली. भेटी दरम्यान महाराष्ट्रातील शैक्षणीकदृष्ट्या महत्वाच्या विषयांवर, नवीन शैक्षणिक धोरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर निवडणूकीबद्दल सविस्तर माहिती देऊन विद्यापीठ विकास मंचने तयार केलेला जाहीरनामा यावेळी देवेंद्र जींना भेट दिला.
डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज येथे निवडणुकी विषयी मार्गदर्शन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणूकी निमित्ताने विद्यापीठ विकास मंचाच्या प्रचारार्थ आज पिंपरी येथील डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज येथे सर्व शिक्षक आणि प्राध्यापकांना निवडणुकी विषयी मार्गदर्शन केले.यात नवीन शैक्षणीक धोरण कसे चांगले आहे, या धोरणासंदर्भात महाराष्ट्राची भूमिका कशी असेल याविषयी मत व्यक्त केले. त्याचबरोबर मागील काळात सिनेटच्या मध्यमातून जी कामे केली आहेत, धोरणं राबवली आहेत यावर देखील प्रकाश टाकला.
जाहीरनामा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणूक 2022 च्या निमित्ताने 'विद्यापीठ विकास मंच'च्या उमेदवारांबद्दल सविस्तर माहिती, जाहीरनामा सोबतच्या पत्रकातून सविस्तर देत आहोत. सर्व नोंदणीकृत पदवीधर मतदारांना विद्यापीठ विकास मंचच्यावतीने विनम्र आवाहन करतोय - विद्यार्थी केंद्रित शिक्षणासाठी विद्यापीठ विकास मंचच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देऊयात.. ! मतदान येत्या रविवारी, दिनांक २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. सहभागी व्हा.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी आज आमच्या घरी भेट
अतिथी देवो भवः
पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर
बावनकुळेजी यांनी आज आमच्या घरी भेट देऊन भोजनाचा आस्वाद घेतला... दौऱ्यावर असताना,
प्रवासात कार्यकर्त्याच्या घरी जाऊन भेट घेणं, जेवणाचा आस्वाद घेणं ही भाजपची
परंपरा आहे. ‘अतिथी देवो भवः’ असं मानणाऱ्या आपल्या संस्कृतीप्रमाणे पांडे
कुटुंबियांना बावनकुळेजींचा सत्कार व पाहुणचार करण्याची संधी लाभली, त्याबद्दल मी
मनापासून आनंदी आहे.
'मॅन ऑफ लॉयल्टी'ची बॅट !
प्रोफेशनल जगात लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असलेला प्रवीण दोस्तीच्या दुनियेत
सच्चा मित्र! काल आमच्या या दोस्ताचा, भाईचा बड्डे सगळ्यांनी मिळून साजरा केला.
त्याला शुभेच्छा द्यायला म्हणून कार्यक्रमाला गेलो तर या दोस्ताने मलाच 'मॅन ऑफ
लॉयल्टी'चा अवॉर्ड देऊन सत्कार केला.
गेली ४० वर्ष एक कार्यकर्ता या नात्याने मी काम करतोय. त्यामागे सामाजिक
उत्तरदायित्वाची भावना अधिक ठळक असते. प्रवीण आणि मित्रांनी केलेलं हे कौतुक म्हणजे
समाजातील सज्जनशक्तीने आपल्या कामाची घेतलेली दखल आहे, असे मी समजतो. दोस्ताकडून
होणारं कौतुक आणि प्रवीणने यावेळी व्यक्त केलेल्या भावना मनाला बळ देणाऱ्या होत्या.
काल बड्डे बॉय प्रवीण बोलत होता आणि माझ्या मनात ४० वर्षांचा प्रवास! शब्दशः
वेडं होऊन लाखो विद्यार्थ्यांसमोर केलेली भाषणं - मांडणी - आंदोलनं असा जीवनपट
डोळ्यासमोर तरळून गेला.
उच्च शिक्षणातले बदलते प्रवाह: संधी आणि आव्हाने' या विषयावर चर्चासत्र
पुणे एज्युकेशन फोरमने 'उच्च शिक्षणातले बदलते प्रवाह: संधी आणि आव्हाने' या
विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते.
या चर्चासत्रात उच्च व
तंत्रशिक्षणमंत्री मा.ना. चंद्रकांतदादा पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी जागतिक
कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ.कारभारी काळे आणि डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
या
चर्चासत्रात मी प्रस्तावना करताना चर्चासत्राचा उद्देश, नवे राष्ट्रीय शिक्षण
धोरण-२०२०, त्याची रचना, धोरणाचे लक्ष्य, अंमलबजावणी यावर प्रकाश टाकला.
त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात केवळ प्रश्नच न मांडता उपाययोजना सुचवणे, आपला
सहभाग नोंदवणे आणि उद्याची पिढी घडवण्यासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन
देखील केले.
या चर्चासत्रासाठी आमदार राहुल कुल, डॉ. गजानन एकबोटे, डॉ.
राजेंद्र विखे पाटील, ॲड. एस.के.जैन, ॲड. नितीन ठाकरे, हेमंत धात्रक, डॉ.पी. डी.
पाटील, डॉ.अपूर्व हिरे, डॉ. सुधाकर जाधवर, डॉ संजय चाकणे, विद्यापीठांचे माजी
कुलगुरू, शैक्षणिक क्षेत्रातील विविध शिक्षणसंस्थांचे प्रतिनिधी, आदी मान्यवर
उपस्थित होते.
सिनेट निवडणूक - विद्यापीठ विकास मंच
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ च्या पदवीधर अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी
विद्यापीठ विकास मंचच्या दहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी मंचचे समन्वयक म्हणून उपस्थित होतो. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या
अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर यंदाची सिनेट महत्वाची असून विद्यार्थी आणि शिक्षण
क्षेत्र हितासाठी मंचचे सर्व १० पैकी १० उमेदवार निवडणूक द्यावे असे आवाहन यावेळी
केले.
विद्यापीठ विकास मंचच्या वतीने पुण्यातून प्रसेनजीत फडणवीस, बागेश्री
मंठाळकर, संतोष ढोरे, दादाभाऊ शिनलकर, राहुल पाखरे, गणपत नांगरे
अहमदनगरमधून युवराज नरवडे, सचिन गोरडे तर
नाशिकमधून विजय सोनवणे, सागर वैद्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज भरताना डॉ.राजेंद्र विखे, डॉ.गजानन एकबोटे, डॉ.अपूर्व हिरे, अभाविपचे
राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.प्रशांत साठे, मंचचे प्रदेशाध्यक्ष प्रा.एन.डी.पाटील,
प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, माजी महापौर माई ढोरे, उपमहापौर सुनीताताई वाडेकर
आदींसह नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
TJSB नवीन संचालक नियुक्ती
सहकार क्षेत्रातील अग्रणी असलेली आणि वीस हजार कोटींची उलाढाल असलेल्या TJSB सहकारी
बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक श्री.शरद गांगल यांची निवड झाल्याबद्दल,
पुण्यात आज त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा
दिल्या.
यावेळी सामाजिक आणि सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंतांसोबत
त्यांनी वार्तालाप केला.
MNGL संगीत मैफल
भाऊबीज निमित्ताने महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड (MNGL) तर्फे आयोजित 'ओवाळीते
भाऊराया' ही गीत संगीताची सुरेल मैफल शब्द, सूर आणि तालाच्या त्रिवेणी संगम अशा
सुंदर वातावरणात बालगंधर्व रंगमंदिरात पार पडली. यावेळी एमएनजीएलच्या
प्रगतीवर प्रकाश टाकत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सोबत व्यासपीठावर
एमएनजीएलचे डायरेक्टर दीपक सावंत, कमर्शियल डायरेक्टर संजय शर्मा, संवाद पुणेचे
सुनील महाजन आणि निकिता मोघे आदी मान्यवर उपस्थित होते.
या मैफलीत पुण्याच्या
संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक विश्वात मोलाची भर घालणारे अमेय जोग, दिपीका जोग,
मनिषा निश्चिल(कान्हेगावकर), मनोज कान्हेगावकर, अभिनेत्री आणि नृत्यांदना नुपुर
दैठणकर, संतुर वादक निनाद दैठणकर हे भाऊ बहीण सहभागी झाले होते.
NYCS Annual बैठक
नॅशनल युवा को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेडच्या प्रतिनिधींची २१ वी वार्षिक
सर्वसाधारण सभा नुकतीच नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे
संपन्न झाली. या सभेमध्ये भारताच्या प्रत्येक भागातून प्रतिनिधी सहभागी
झाले होते. यावेळी सन २०२२-२०२७ साठीच्या नवीन सदस्य मंडळाची एकमताने निवड
करण्यात आली.
वार्षिक सभेनंतर सहकार भारतीचे अध्यक्ष श्री दीनानाथ
ठाकूर आणि संघटक सचिव श्री संजय पाचपोर यांनी सहभागी प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.
गौरांग प्रभू व्याख्यान
आंतरराष्ट्रीय पातळीवरील वक्ते, इस्कॉन गव्हर्निंग बॉडी कमिशनचे सदस्य गौरांग
प्रभू यांचे ‘भागवद्गीतेत सांगितलेले आदर्श नेतृत्वगुण’ या विषयावर काल
व्याख्यान झाले. त्यावेळी त्यांनी गीतेतील नेतृत्वगुणांबद्दल सविस्तर विवेचन
केले. आपल्यामध्ये नेतृत्व करण्यासाठी वैयक्तिक गुण, उत्कृष्ट संवाद
साधण्याचे कौशल्य, प्रश्न व समस्या सोडविण्याची वृत्ती, संवेदनशील मन आणि चांगले
मार्गदर्शक, नियंत्रक, प्रशिक्षक असणे असे पाच गुण असणे आवश्यक आहे. आदर्श
नेतृत्वासाठी आवश्यक असणाऱ्या या पाच गुणांचे महत्त्व भगवान श्रीकृष्ण यांनी
श्रीमद् भगवद्गीता यातून सांगितले आहे,’ असा कानमंत्र गौरांग प्रभू यांनी दिला.
हा कार्यक्रम माझ्या समर्थ युवा फाउंडेशन आणि शिक्षण प्रसारक मंडळी, हिंदू
आध्यात्मिक सेवा संस्था यांच्या माध्यमातून घेण्यात आला होता.
सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार
युवा सक्षमीकरणासाठी दिलेल्या योगदानाबाबत सूर्यदत्त इन्स्टिट्युट, पुणे तर्फे राष्ट्रीय पुरस्कार
कौशल्य सेतू
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागासह विशेष कौशल्य विकास कार्यक्रमाची निर्मिती; एनएसडीसीने प्रमाणित केलेले कौशल्य विकास कार्यक्रम या उपक्रमाद्वारे १०८ पेक्षा अधिक शाळांपर्यंत पोहोचवले जातात. १० वी नापास झालेल्या २२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महाआरोग्य परिषद, २०१६
वैद्यकीय विकास मंच, महाराष्ट्र प्रदेश यांच्या सहकार्याने महाआरोग्य परिषदेचे आयोजन करण्यात आले
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे विशेष पुरस्कार
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे विशेष पुरस्कार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्याहस्ते विशेष पुरस्कार
युवा संसद
या उपक्रमात सहभाग घेऊन तरुणांना राष्ट्रनिर्मितीत योगदान करण्याचे आवाहन केले.
समर्थ युवा फाउंडेशन
सामाजिक दायित्व पूर्ण करत २०१७ साली समर्थ युवा फाउंडेशनची सुरुवात केली.
हरित वारी, २०१९
पंढरपूर वारीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) २० हजार स्वयंसेवकांच्या सहभागातून हरित वारीचे आयोजन; वृक्षारोपण मोहिमेच्या विक्रमाची नोंद गिनेज बुकमध्ये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १६,७३१ निंबाच्या रोपांचे ३७० महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वाटप
संचालक, एमएनजीएल
एमएनजीएलचे स्वायत्त संचालक म्हणून २०१५ मध्ये सात हजार घरांमध्ये असलेली पाईप गॅस योजना २०१७ च्या तिसऱया तिमाहीपर्यंत सव्वा लाख घरांमध्ये पोहोचवली. हरित आणि स्वच्छ पुणे शहरासाठी सीएसआर निधीतून विविध योजनांची अंमलबजावणीचे काम सुरु.
अटलशक्ती महासंपर्क अभियान
पुणे शहरातील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांबाबत माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. २५ डिसेंबर या अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन ३५ हजार कार्यकर्त्यांनी एक लाख तीस हजार घरांमध्ये मोदी सरकारच्या योजनांबाबत माहिती दिली.
राष्ट्र गौरव सन्मान, २०२२
विश्व मैत्री संघ भारतवर्षतर्फे शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी आझादी का अमृतमहोत्सव निमित्त राष्ट्र गौरव सन्मान