मेरी माटी, मेरा देश

मेरी माटी, मेरा देश" या देशव्यापी आणि लोकाभिमुख अभियानाच्या महाराष्ट्र "प्रदेश संयोजक" पदाची जबाबदारी

"मेरी माटी, मेरा देश" ! 'मन की बात' या लोकप्रिय कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या "मेरी माटी, मेरा देश" या देशव्यापी आणि लोकाभिमुख अभियानाच्या महाराष्ट्र "प्रदेश संयोजक" पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी माझ्यावर सोपवली आहे. देशासाठी प्राणांची बाजी लावलेल्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'मेरी माटी, मेरा देश' उपक्रम देशभरात साकार होत आहे. या देशव्यापी अभियानात 'मिट्टी यात्रा', 'वसुधा वंदन', 'वीरो को वंदन', 'ध्वज वंदन', शिलाफलकांची उभारणी अशा उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा समारोप दिल्लीत कर्तव्य पथावर ७५०० युवकांच्या उपस्थितीत होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत युवकांना पंचप्राण शपथ देऊन देशभरातून हुतात्म्यांच्या गावांतून गोळा केलेल्या मातीतून अमृत वाटिकेचे निर्माण करण्यात येणार आहे. या अभियानाने 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' स्मारकाचे समर्पण करण्यात येईल. देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आम्ही यापूर्वी 'हर घर तिरंगा' विश्वविक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मदतीने राबविला. देशाचा अभिमान जागविणारे "मेरी माटी, मेरा देश" अभियान महाराष्ट्रात प्रत्येक नागरिकांपर्यंत आणि ४० लाख युवकांपर्यंत घेऊन जाण्याचा संकल्प आम्ही केला आहे. या उपक्रमाची राज्यभरात अंमलबजावणी करुन हा उपक्रम आम्ही यशस्वी करू. माझ्यावर सोपविलेल्या या जबाबदारीबद्दल मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळेजी यांचे आभार.


पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजींचे पुणे विमानतळावर स्वागत !💐

भारतीय जनता पार्टीच्या 'महाविजय २०२४' साठी शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि त्याअंतर्गत विधानसभा क्षेत्रांच्या समन्वयकपदाची जबाबदारी

निर्धार महाविजयाचा... आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयासाठी भारतीय जनता पार्टीच्या 'महाविजय २०२४' साठी शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि त्याअंतर्गत विधानसभा क्षेत्रांच्या समन्वयकपदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी माझ्यावर सोपवलेली आहे. ‘संघटन हेच सामर्थ्य’ या विश्वासातून मी गेली ४० वर्षे संघटनेत कार्यरत आहे. नवीन जबाबदारीतही त्याच निष्ठेने पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वांसोबत काम करेन. माझ्यावर विश्वास ठेवून दिलेल्या जबाबदारीबद्दल मी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मनापासून आभार मानतो.


पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजींचे पुणे विमानतळावर स्वागत !💐

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजींचे पुणे विमानतळावर स्वागत !💐

मनस्वी स्वागत ! देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजींच्या शुभहस्ते पुण्यनगरीत विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण आज संपन्न झाले. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे मोदीजींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. यानिमित्ताने मोदीजींचे पुण्यनगरीत आगमन झाले असता सकाळी त्यांचे पुणे विमानतळावर स्वागत केले.!💐


पुणे महापालिका निवडणूक प्रमुख

पुणे महापालिका निवडणूक प्रमुख

प्रदेश भाजपने "पुणे महापालिका निवडणूक प्रमुख" म्हणून माझी नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शिफारशीनुसार ही निवड झाली आहे. पक्ष नेतृत्वाने टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवीन. महापालिकेच्या माध्यमातून भाजपने शहरात मोठी विकासकामे केली आहेत. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही मागील यशाची पुनरावृत्ती करू. त्यासाठी मी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करीन. बूथ रचनेचे सक्षमीकरण, नियोजनबद्ध निवडणूक व्यवस्थापन आणि विकासकामे व योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू.


भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष - नवीन जबाबदारी!

भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष - नवीन जबाबदारी!

संघटन, निष्ठा आणि सातत्य! संघटन निष्ठा आणि कार्यकर्त्यावर विश्र्वास हेच भाजपच्या विकासाचे सूत्र आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आज प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या कामावर विश्वास ठेवून प्रदेश उपाध्यक्ष पदाची नवीन जबाबदारी मला सोपविण्यात आली आहे. याबद्दल मी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील आणि पक्षाच्या सर्व मान्यवरांचा शतशः आभारी आहे. गेली ४० वर्ष संघटनेत निरपेक्षपणे योगदान देत आलोय, त्याचीच ही पावती समजतो. जबाबदारीची जाणीवही आहे. सामाजिक परिवर्तन आणि अंत्योदयाचा ध्यास घेऊन राजकारण करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. शून्यातून सुरुवात करुन अविरत संघर्ष करीत भाजप आज जगात नंबर एकचा पक्ष बनला आहे. उज्ज्वल परंपरा लाभलेल्या या पक्षात प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मिळालेली जबाबदारी मी निष्ठापूर्वक, संघटन सर्वोपरी मानून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ताकदीने पार पाडेन असा विश्वास आहे.


#G20च्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सर्व प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले

तिसरी एज्युकेशन वर्किंग ग्रुप (EDWG) बैठक, भुवनेश्वर

भारताच्या G20 च्या अध्यक्षतेखालील तिसरी एज्युकेशन वर्किंग ग्रुप (EDWG) बैठक भुवनेश्वर येथे गेले दोन दिवसापासून सुरू आहे. या बैठकीत सहभागी झालो. या वेळी आयोजित 'फ्यूचर ऑफ वर्क' प्रदर्शनाला देखील भेट दिली. जिथे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पना पाहता आल्या. या प्रदर्शनामध्ये उद्योग, शैक्षणिक संस्था, सरकारी संस्था, बहुपक्षीय एजन्सी, स्टार्टअप आणि इतर संस्था यांचा सक्रिय सहभाग आहे. आम्हा सहभागी लोकांना ओडिसाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा अनुभवण्याची आणि राज्याच्या इतिहास आणि परंपरांबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी यावेळी मिळाली. शैक्षणिक क्षेत्रात जागतिक बदल घडवून आणण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना आणि धोरणांवर चर्चा आणि अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने यापूर्वी चेन्नई आणि अमृतसर येथे या कार्यगटाच्या बैठका झालेल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या मार्गदर्शनानुसार, भारत सरकार प्रामुख्याने शैक्षणिक आणि व्यावसायिक शिक्षणाच्या एकत्रीकरणाद्वारे कौशल्ये विकास, मूल्यांकन आणि मान्यताप्राप्त करण्याच्या पद्धतींवर पुनर्विचार करत आहे. असे मत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी मांडले.


जी२० पुस्तिकेचे प्रकाशन
जी२० पुस्तिकेचे प्रकाशन

जी२० पुस्तिकेचे प्रकाशन

नाशिक येथे सुरू असलेल्या भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी बैठकीत जी२० पुस्तिकेचे प्रकाशन मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेर्यंत जी२० बद्दलची माहिती आणि त्यातून जगाच्या पटलावर भारतासमोर निर्माण होणाऱ्या संधी मांडण्याचा संकल्प प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भाजपने केला आहे. त्यासाठी प्रचार आणि प्रसार याची पंचसूत्री निश्चित करण्यात आली. पंचसूत्री नियोजनांतर्गत जी२० माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
पुस्तिकेत जी२० बद्दलचे महत्वाचे तपशील आहेत. याशिवाय लोकसहभाग वाढविण्यासाठीच्या योजना आणि उपक्रम याबद्दलही माहिती आहे. पुढील वर्षभरासाठी प्रदेश भाजपने केलेल्या नियोजनाची रूपरेषा आणि त्याअंतर्गत आजपर्यंत झालेले उपक्रम याबद्दलही सविस्तर माहिती पुस्तिकेत आहे.


#G20च्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सर्व प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले

#G20च्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सर्व प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले

#G20 च्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सर्व प्रतिनिधींसाठीं सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लावणी, पोतराज, मर्दानी खेळ, लेझिम इत्यादींसह शिवराज्याभिषेकच्या थीमवर सांस्कृतिक कार्यक्रमांनी पुण्यातील देश-परदेशातील प्रतिनिधींना भुरळ घातली. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणावेळी ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी देखील ठेका धरला. शिवरायांच्या शिव वाहनाने सर्वच मंत्र मुग्ध झाले. तत्पूर्वी विविध देशांच्या प्रतिनिधींनी विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात विविध झाडांचं वृक्षारोपण करून त्यांची माहितीही जाणून घेतली.


G20summit

Recently had an interaction with veteran businessman & philanthropist Shri Cyrus Poonawala ji. I shared our efforts to sensitize people on G20summit. We discussed the opportunities emerging for the #business, #industry, employment in the near future.


जी२० मंथन बैठक : भाजपा, महाराष्ट्र प्रदेश

जी२० मंथन बैठक : भाजपा, महाराष्ट्र प्रदेश

भारताच्या अध्यक्षतेखाली प्रथमच होणाऱ्या #जी२० शिखर परिषदेच्या निमित्ताने भाजपने प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेशची ‘भाजप जी२० समिती’ गठित केली आहे. प्रदेश संयोजक म्हणून या समितीची पहिली मंथन बैठक पुण्यात श्री. Chandrashekhar Bawankule यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती.


भाजप जी २० समितीने येत्या वर्षभरात लोकसहभाग वाढविण्यासाठी 'पंचसूत्री' उपक्रमाचे नियोजन केले आहे. यामध्ये विचार, प्रचार, संवाद, सहभाग, प्रभाव अशा पंचसूत्रीचा समावेश असेल. मा. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी भारताचे विश्वगुरू बनण्यासाठी मांडलेले व्हिजन आणि केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना केंद्रस्थानी ठेवून सर्व उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने जी२० आणि देशासमोर निर्माण झालेल्या संधी १३ कोटी जनतेसमोर मांडायचा संकल्प प्रदेश भाजपने केला आहे, अशी मांडणी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी यावेळी केली. याबद्दलच्या पहिल्या माहिती पोस्टरचे प्रकाशन आजच्या बैठकीत करण्यात आले. त्याचबरोबर समितीत जिल्हावार वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ लोकांचा समावेश करण्याची सूचना केली; आणि प्रत्येक जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रानुसार यशस्वी व्यक्तीस #जी२० मध्ये कसे सामावून घेता येईल, या दृष्टीने प्रयत्न करण्यास सांगितले.

समितीची ही पहिली बैठक असल्यामुळे जी२० बद्दलची सर्वंकष माहिती आणि महाराष्ट्र प्रदेशचे आगामी उपक्रम याचे सादरीकरण केले. जगातील सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणून भारत उदयास आला आहे. त्यामुळे भारतातील तरुणांना अधिकाधिक संधी निर्माण होत आहेत. जी २० च्या माध्यमातून या संधीचे सोने करण्याची वेळ अली आहे. त्याचबरोबर महिला, शेती, उद्योजक अशा अनेकविध समाजघटकांनादेखील यानिमित्ताने संधी उपलब्ध होत आहेत. या संधींविषयी लोकजागृतीची चळवळ आम्ही हाती घेतली आहे. शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही चळवळ घेऊन जाण्याचा आमचा संकल्प आहे.”असे मत व्यक्त केले.

कमिटीतील सर्व सदस्यांनी आपापल्या विचारांचे आदानप्रदान करत लोकसंवाद आणि जनजागृतीसाठीचे उपक्रम निश्चित केले.


Guinese book
Guinese book

गिनीज रेकॉर्ड

संकल्पना: 'हर घर तिरंगा, युवा संकल्प अभियान'

भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त(अमृत महोत्सव) देशभर 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा करण्याच्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ विभागाच्यावतीने पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील दीड लाख विद्यार्थ्यांच्या सहभागातून 'हर घर तिरंगा, युवा संकल्प अभियान' राबवण्याची संकल्पना उदयास आली. हे अभियान म्हणजे तिरंगा ध्वजासोबतच्या दीड लाख फोटोंचा गिनीज बुक विश्वविक्रम करत जाज्वल्य राष्ट्रभक्ती जागवणारे अभियान होय. या अभियानासाठी जिल्हानिहाय बैठक घेऊन ७५० हून अधिक महाविद्यालये, ६५,००० राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, ३००० हून अधिक प्राध्यापक यांच्या एकत्रित प्रयत्नातून ५ लाखाहून अधिक विद्यार्थी व नागरिक आणि विविध सामाजिक क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला.


शुभारंभ :

९ ऑगस्ट २०२२ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात या अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. विद्यार्थ्यांनी घेतलेला हा पुढाकार आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देवेंद्रजींनी लावलेली उपस्थिती ही खूप कौतुकाची बाब आहे. या कार्यक्रमादरम्यान देवेंद्रजी म्हणाले, ‘महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटावा असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे.’ पुणे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या ६०० हुन अधिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.


संकल्पपूर्ती : नोंद विश्वविक्रमाची !

आणि अखेर १५ ऑगस्ट रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 'तिरंगा ऑनलाईन फोटो अल्बम' उपक्रमात तब्बल १,५२,५५९ फोटोंची विक्रमी नोंद करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान पटकावले. महामाहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत विद्यापीठने हा नवा इतिहास घडविला. गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ऋषी नाथ यांनी विद्यापीठाच्या विश्वविक्रमाची घोषणा केली. अशा प्रकारचा रेकॉर्ड करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एकमेव आहे.


Atalshakti

अटलशक्ती महासंपर्क अभियान

संकल्पना:

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी 25 डिसेंबर रोजी संपूर्ण शहरात दीड लाख कुटुंबीयांशी संपर्क साधणारा ‘अटलशक्ती महासंपर्क अभियान: साद घालूया, संवाद साधुया !’ हा कार्यक्रम राबविण्याचे ठरले. हा कार्यक्रम केवळ संपर्काचा नाही, तर संवादाचाही होता. केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजना पुणेकरांपर्यंत पोहोचविणे, पुणे महापालिकेच्या महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती देणे आणि व्यापक जनसंपर्क करणे, ही उद्दिष्टे ठेवून हे अभियान राबविण्याचे ठरले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आले असता, बूथ कार्यकर्ता संवाद मेळाव्यात 'मेरा बूथ, सबसे मजबूत,'चा नारा त्यांनी दिला. या नाऱ्यातच या अभियानाची बीजं रोवली गेली.


शुभारंभ आणि लोगो अनावरण:

या अभियानाचा शुभारंभ आणि लोगोचे अनावरण विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मंडलनिहाय, प्रभागनिहाय, शक्तिकेंद्रनिहाय, बूथनिहाय आणि बूथ समिती नियोजन बैठका झाल्या. शहरातील ८ मंडल, ६० प्रभागप्रमुख, ६०० शक्तिकेंद्रप्रमुख, ३ हजार बूथप्रमुख आणि ३० हजार बूथसंपर्क कार्यकर्ते दीड लाख घरांना भेट देऊन सहा लाख मतदारांपर्यंत संपर्क साधण्याचे नियोजन करण्यात आले.


संकल्पपूर्ती:

२५ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत हे अभियान राबवविले गेले. या दिवशी अटलजींच्या स्मृतीस अभिवादन करून या अभियानाला सुरुवात झाली. या वेळी प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन संकल्प केला. प्रत्येक कार्यकर्त्याने दिलेल्या यादीतील पाच घरांना दिवसभरात भेट दिली. त्यांना अभियान पुस्तिका दिली. भेट दिलेल्या घरात केंद्र सरकारच्या अभियानाचे लाभार्थी असल्यास त्यांच्याकडून अभिप्राय घेतला. एकाच दिवसात ३०००० हुन अधिक भाजप कार्यकर्त्यांनी पुणे शहरातील सुमारे दीड लाखांहून अधिक घरी केंद्र सरकाच्या योजनांबद्दल जागरूरकता निर्माण करण्यासाठी भेटी दिल्या.


Virat Morcha

पै.खाशाबा जाधव क्रीडा संकुल: क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक दिवस

गेल्या अनेक वर्षापासून क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देण्याच्या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या क्रीडा संकुलाचे उद्घाटन केंद्रीयमंत्री श्री. अनुराग ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. विद्यापीठाच्या आवारात साकारण्यात आलेल्या विविध क्रीडा प्रकारांच्या २७ एकरातील या क्रीडा संकुलाला विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले पै.खाशाबा जाधव यांचे नाव देण्यात आले आहे. या क्रीडा संकुलाची वैशिष्ट्ये म्हणजे - सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅक, फुटबॉल, अस्ट्रो टर्फ लॉन टेनिस कोर्ट; आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शूटिंग रेंज; अद्ययावत व्यायामशाळा; खो-खो, कबड्डी, कॉर्फ बॉल, हॅण्डबॉल असे मैदानी खेळाचे क्रीडांगण. तसेच बहुउद्देशीय इनडोअर हॉल; बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, ज्यूदो, कराटे, नेटबॉल, टेबल टेनिस; कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स असे विविध क्रीडा प्रकारही इथे खेळता येतील. हे क्रीडा संकुल उभारण्यासाठी माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर यांनी विशेष योगदान दिले आहे.


Jansanvad Abhiyan

जनसंवाद अभियान

पुण्यात भारतीय जनता पार्टीकडून १ मे ३० मे २०२२ या कालावधीत ‘जनसंवाद अभियान’ पार पडले. या अभियानाचा शुभारंभ कॅबिनेट मंत्री श्री. चंद्राकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिका विकास कामाच्या कार्य अहवाल प्रकाशन सोहळण्याचेही आयोजन करण्यात आले होते. जनसंवाद अभियानाची अंमलबजावणी कशी करायची, नागरिकांशी कसा संवाद साधायचा, आतापर्यंत कोणती विकासकामे झाली आहेत याची माहिती नागरिकांपर्यंत कशी पोहोचवायची याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. राजेश पांडे यांनी अभियानाचे विस्तृत मार्गदर्शन केलं.


सावित्रीबाई फुले पूर्णाकृती पुतळा अनावरण

सावित्रीबाई फुले पूर्णाकृती पुतळा अनावरण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, तत्कालीन विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी हा कार्यक्रम पार पडला.


swach-vari

स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी-लोकशाही वारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा विभाग नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो. या वर्षीही राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी-लोकशाही वारी’ या अनोख्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षांनंतर होणाऱ्या या पालखीसोहळ्यात विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. या दिंडीत २०० विद्यार्थी पूर्ण वेळ चालले. तर पालखीच्या पुणे मुक्कामाच्या दोन दिवसांत १००० विद्यार्थ्यांनी शहरात स्वच्छता अभियान राबविले.


Virat Morcha

विराट मोर्चा, ७ सप्टेंबर १९९३, मुंबई

"शिक्षण आमच्या हक्काचं - नाही कुणाच्या बापाचं” या घोषणांनी आसमंत दुमदुमून सोडणारा विराट विद्यार्थी मोर्चा ७ सप्टेंबर १९९३ रोजी मुंबई मंत्रालयावर धडकला. अभाविपचं राज्य सचिव या नात्याने या मोर्चाच्या आयोजनाची आणि संपूर्ण समन्वयाची जबाबदारी पार पाडली. त्यासाठी राज्याभरातील आठ लाखांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्याच्या विविध भागातून १.२५ लाख विद्यार्थी या आंदोलनासाठी एकत्र जमले होते. विद्यार्थी चळवळीच्या इतिहासातील ते सर्वात मोठे आणि यशस्वी संघटन ठरले. सार्वजनिक जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारे बहुआयामी राष्ट्रीय विद्यार्थी संघटन करणे आणि बहुविध उपक्रमांनी या संघटनाची पुनर्रचना करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. माझ्या कार्यकाळात सर्वसमावेशक शैक्षणिक सुधारणांसाठी मी सातत्याने संघर्ष केला.


Thiya Andolana

ठिय्या आंदोलन, २५ जून १९९५, मुंबई मंत्रालय

वनवासी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी मुंबईत मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलन , महाराष्ट्रातील सुमारे ३५० हुन अधिक पाड्यांवर जाऊन वनवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे शिक्षण, वसतिगृह इत्यादी प्रश्न समजून घेतले. ६००० विद्यार्थ्यांनी या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला


Uva-mahotsava

युवा महोत्सव

शिक्षण क्षेत्रात विविध पदांवर काम करतांना युवकांच्या सक्षमीकरणासाठी नवनवीन संकल्पना राबवल्या. यातूनच अश्वमेध, स्पंदन, युवारंग सारख्या उपक्रमांची सुरुवात झाली.


NYCS-GAIL

NYCS GAIL रफ्तार

NYCS अंतर्गत भारतातील सर्वोत्तम ॲथलिट्स शोधणे या हेतूने GAIL पुरस्कृत उपक्रम राबविण्यात आला. २०१५ ते २०१८ या कालावधीत २,७५,००० हून अधिक क्रीडापटूंनी या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांपैकी २२ जण सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन आपल्या क्रीडाकौशल्यांना पैलू पाडण्यासाठी मेहनत घेत आहेत.


Khelotsav

इंडिया का खेलोत्सव

सर्वसमावेशक क्रिडा प्रदर्शन; चर्चासत्र, प्रदर्शने, यांचा समावेश. खेलो इंडियाच्या समांतर उपक्रम. १२ दिवसांच्या कार्यक्रमात ७००० खेळाडू, ४००० प्रशिक्षकांचा सहभाग. ४० हजार शालेय विद्यार्थ्यांची प्रदर्शनाला भेट.