G-20-Pune

भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष - नवीन जबाबदारी!

संघटन, निष्ठा आणि सातत्य! संघटन निष्ठा आणि कार्यकर्त्यावर विश्र्वास हेच भाजपच्या विकासाचे सूत्र आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आज प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या कामावर विश्वास ठेवून प्रदेश उपाध्यक्ष पदाची नवीन जबाबदारी मला सोपविण्यात आली आहे. याबद्दल मी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील आणि पक्षाच्या सर्व मान्यवरांचा शतशः आभारी आहे. गेली ४० वर्ष संघटनेत निरपेक्षपणे योगदान देत आलोय, त्याचीच ही पावती समजतो. जबाबदारीची जाणीवही आहे. सामाजिक परिवर्तन आणि अंत्योदयाचा ध्यास घेऊन राजकारण करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. शून्यातून सुरुवात करुन अविरत संघर्ष करीत भाजप आज जगात नंबर एकचा पक्ष बनला आहे. उज्ज्वल परंपरा लाभलेल्या या पक्षात प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मिळालेली जबाबदारी मी निष्ठापूर्वक, संघटन सर्वोपरी मानून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ताकदीने पार पाडेन असा विश्वास आहे.

G-20-Pune

जी-२० परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात होणाऱ्या भाजपच्या कार्यक्रमांचे 'प्रदेश संयोजक' म्हणून नियुक्ती.

देशसेवेची मोलाची संधी, प्रदेश भाजपकडून नवीन जबाबदारी!

नमस्कार, आपल्याला सर्वाना सांगायला अत्यंत समाधान वाटते की जी-२० परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात होणाऱ्या भाजपच्या कार्यक्रमांचे 'प्रदेश संयोजक' म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठीचे पत्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडून नुकतेच मिळाले.

वसुधैव कुटुम्बकम् :'एक वसुंधरा, एक कुटुंब आणि एक भविष्य' या संकल्पनेवर आधारित असलेल्या भारत देशाला मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात जी२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद मिळालं आहे. हा फक्त नेत्यांचा बहुमान नाही तर देशातील प्रत्येक नागरिकासाठी जागतिक पटलावर सुवर्ण संधी निर्माण करून देणारा हा क्षण आहे.

राज्यभरात होणारे जी२० परिषदेचे कार्यक्रम करताना रचनात्मक लोकसहभाग, युवा वर्गामध्ये आगामी संधींबद्दल जनजागृती, शिक्षण, उद्योग क्षेत्रात तयार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संधी मांडणे यावर आमचा भर असेल.


G-20-Pune G-20-Pune

महाराष्ट्र सरकारच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) राज्य सल्लागार समितीत अशासकीय सदस्य म्हणून नेमणूक

महाराष्ट्र सरकारच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) राज्य सल्लागार समितीची नुकतीच पुनर्रचना करण्यात आलीय. या समितीत अशासकीय सदस्य म्हणून माझी नेमणूक करण्यात आली आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र जी फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार.

राज्यातील सर्व प्रकारची विद्यापीठे तसेच महाविद्यालयांतील एनएसएसचे कामकाज अधिक कार्यक्षम पद्धतीने व्हावे, म्हणून ही समिती काम करत असते. समितीत अशासकीय सदस्य म्हणून माझ्यासोबत राज्याचे माजी संपर्क अधिकारी डॉ.प्रमोद पाब्रेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सहायक प्रा. डॉ. सतीश लोकपाल चापले यांचाही समावेश आहे.

तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय. शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविण्याचा प्रयत्न आमच्याकडून नक्कीच केला जाईल, याची सर्व समिती सदस्यांच्यावतीने ग्वाही देतो.

पुनश्च आभार आणि इतर सदस्यांचे अभिनंदन..!


मॅन ऑफ लॉयल्टी'ची बॅट !

'मॅन ऑफ लॉयल्टी'ची बॅट !

४० वर्ष राष्ट्रनिर्माणाच्या विचाराने प्रेरित होऊन सातत्याने युवक संघटन आणि सक्षमीकरण यासाठी केलेल्या कामाबद्दल आमचे मित्र लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असलेले प्रवीण तरडे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'मॅन ऑफ लॉयल्टी'चा अवॉर्ड देऊन सत्कार केला.


Suryadatta Award

Suryadatta National Award

Suryadatta Institute, Pune felicitated with Suryadatta National Award recognizing contribution in youth empowerment and education.


Maharashtra Rajya Marathi Patrakar Sangha honoured with a special award.

Maharashtra Rajya Marathi Patrakar Sangha honoured with a special award. The felicitation was done by Shri Nitin Ji Gadkari and Sadhguru Jaggi Vasudev (2020)


  Award

Azadi Ka Amrit Mahotsav (2022)

Vishwa Maitri Sangha BharatVarsh recognized contribution in Education Sector Rashtra Gaurav Sanman on the Occasion of Azadi Ka Amrit Mahotsav (2022)